Home महाराष्ट्र सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या चेअरमन पदी अध्यात्मिक वारसा असणारे संतोष वाघ यांची निवड.l

सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या चेअरमन पदी अध्यात्मिक वारसा असणारे संतोष वाघ यांची निवड.l

99

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

खटाव(दि.28ऑक्टोबर):-महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक आणि गुजरात राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या नूतन चेअरमनपदी संतोष गुलाबराव वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

डॉ. सुरेश जाधव यांनी एक वर्षाच्या कालावधीनंतर स्वेच्छेने गेल्या चार दिवसापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने चेअरमनपदाची ही बिनविरोध निवडणूक झाली.

सोमवारी सकाळी १० वा. सुंदरगिरी महाराजांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टच्या सभागृहात डॉ सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. चेअरमन पदासाठी संतोष वाघ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवड बिनविरोध करण्यात आली. विश्वस्त गौरव जाधव सचिन देशमुख, सचिव विशाल माने यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

वारकरी संप्रदायी असलेले विश्वस्त आज देवस्थान ट्रस्टचे चेअरमन झाल्याने पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळानी त्यांचे अभिनंदन केले. नूतन चेअरमन संतोष वाघ यांचा ग्रामस्थ, मित्रमंडळी आणि पुसेगाव पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी कामगार आयुक्त सुरेश जाधव, माजी चेअरमन मोहनराव जाधव, गुलाबराव वाघ, बाळासाहेब जाधव, सातारा बिल्डर असोसिएशनचे राजेश देशमुख, उद्योजक मदन जाधव व आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सुंदरगिरी महाराजांनी बोलताना डॉ. सुरेश जाधव यांनी त्यांच्या चेअरमनपदाच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचे आणि राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच सेवागिरी देवस्थानचा कारभार लोकाभिमुख, पारदर्शक आणि राजकारण विरहित होण्यासाठी वैचारिक प्रगल्भता असलेले विश्वस्त या देवस्थान ट्रस्टमध्ये असावेत असे मत व्यक्त केले. त्यामुळे मावळते चेअरमन डॉ सुरेश जाधव.

यांनी कायम देवस्थान ट्रस्टच्या पाठीशी उभे स राहून सर्वांना मार्गदर्शन आणि सहकार्य करावे, स तसेच नूतन चेअरमन यांनी देवस्थानचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गावातील ग राजकारण न करता सर्वांना सोबत येऊन कामि करावे असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन विशाल माने यांनी केले. डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.