Home महाराष्ट्र धरणगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्याचा मोठा यश — एकलंग्न येथून पहिली केळीची...

धरणगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्याचा मोठा यश — एकलंग्न येथून पहिली केळीची गाडी उत्तराखंडकडे रवाना! 

367

✒️पी.डी पाटील सर(धरणगाव प्रतिनिधी)

धरणगाव(दि.31ऑक्टोबर):– आजच्या कठीण परिस्थितीत जेव्हा केळी उत्पादक शेतकरी बांधवांना व्यापाऱ्यांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा धरणगाव तालुक्यातील एकलंग्न येथील शेतकरी कांतिलाल महारू पाटील यांनी त्यांच्या चिकाटी, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.

सध्या केळी बाजारपेठेत आवक वाढल्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांकडे जाण्यास तयार नाहीत, परिणामी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळीचा माल खराब होऊ लागला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कांतिलाल पाटील यांनी पहिल्यांदाच केळी लागवड करून केवळ 10 महिन्यांत उत्कृष्ट उत्पादन घेतले आहे.

त्यांना त्रिरत्न ऍग्रो कन्सल्टन्सीचे मार्गदर्शक मोहन शिंदे सर यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केळी बागेला उत्तम ट्रीटमेंट देण्यात आली आणि अवघ्या 40 ते50 रुपयांत प्रति झाड खर्च करून त्यांनी उत्पादन मिळवले, जेथे इतर ठिकाणी हा खर्च सुमारे 120 रुपये प्रति झाड इतका असतो.

या दर्जेदार उत्पादनामुळे त्यांच्या बागेतील केळीला उत्तराखंड राज्यातून मागणी आली असून आज एकलंग्न येथून पहिली केळीची गाडी उत्तराखंडसाठी रवाना झाली आहे.

हे यश केवळ कांतिलाल पाटील यांचे नसून संपूर्ण धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि खर्चाचे नियोजन केल्यास शेतकरी देखील दर्जेदार उत्पादन घेऊन राष्ट्रीय बाजारपेठेत स्वतःचा ठसा उमटवू शकतात, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.