Home चंद्रपूर राजुरा तालुका शालेय क्रीडा स्पर्धाचे बक्षिस वितरण संपन्न

राजुरा तालुका शालेय क्रीडा स्पर्धाचे बक्षिस वितरण संपन्न

298

▪️सुदृढ आरोग्यासाठी क्रीडास्पर्धा आवश्यक.- देवराव भोंगळे

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.7नोव्हेंबर):-क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर , राजुरा तालुका शालेय क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृहात हा बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून देवराव भोंगळे , आमदार , राजुरा विधानसभा क्षेत्र राजुरा हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिश्चंद्र विरुटकर , तालुका क्रीडा संयोजक, राजुरा , विशेष अतिथी म्हणून मोरेश्वर गायकवाड , जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रपूर, वाल्मीक खोब्रागडे, सेवानिवृत शिक्षक, तथा जिल्हा क्रीडा संयोजक, चंद्रपूर तर प्रमुख अतिथी म्हणून एस. एस. धोटे, प्राचार्य, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा , मिलिंद देशकर, शहर महामंत्री, भाजपा, सचिन भोयर, शहर महामंत्री, भाजपा, मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका, इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा, प्रफुल घोटेकर, शहर अध्यक्ष, भाजयुमो, सुधाकर जाधव, मुख्याध्यापक, जी.प.उच्च प्राथमिक शाळा हरदोना (खु.), अभिजीत कोंडावार, शहर महामंत्री, भाजयुमो, क्रीडा शिक्षक राजबिंद्र डाहुले, किशोर चिंचोलकर, भास्कर फरकडे, भार्गवी कोडाली, प्रभाकर साळवे, रविंद्र गोरे , महेंद्र चौधरी , मलिक काजी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल बेले यांनी केले तर प्रास्ताविक हरिश्चंद्र विरुटकर यांनी केले. आभार हर्षल क्षीरसागर यांनी मानले. यावेळी राजुरा तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ठ सहभाग, सर्वात जास्त खेळात सहभाग व विजय यानुसार इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक स्कूल सीबीएससी शाळेला प्रथम क्रमांक, स्टेला मॉरीस कॉन्व्हेंट बामणवाडा द्वितीय क्रमांक, आदर्श हायस्कूल राजुरा तृतीय क्रमांक पटकावला. शाळेला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच वैयक्तिक स्पर्धात विजयी प्रथम, द्वितीय क्रमांकाला गोल्ड व सिल्व्हर मेडल तर सांघिक खेळातील प्रथम, द्वितीय क्रमांकाना सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजुरा तालुक्यातील अनेक सहभागी शाळांनी अथक परिश्रम घेतले.

*राजुरा तालुक्यात पहिल्यांदाच मिळाले आमदारांच्या हस्ते शालेय क्रीडा स्पर्धांमधील विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व मेडल्स*.

तालुका स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित व्हायच्या परंतु बक्षिसे मिळत नव्हती. त्यामुळे कुठंतरी मैदानात अथक परिश्रम करणाऱ्या खेळाडू विद्यार्थी हिरमुस व्हायचे. परंतु देवराव भोंगळे यांनी राजुरा शहरात प्रवेश करताच मागील वर्षांपासून तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाना बक्षिसे जाहीर करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. आणि यावर्षी आमदार म्हणून देवराव भोंगळे यांनी बक्षिस वितरण सोहळ्यात उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. 

*देवराव भोंगळे, आमदार, राजुरा*

        शालेय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये राजुरा तालुक्यातील अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी होऊन तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरापर्यंत गगन भरारी घेतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय क्रीडा स्पर्धा महत्वाच्या असून त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी उपयुक्त ठरते असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.