Home चंद्रपूर बसपाचे निहाल ढोरे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमुळे काँग्रेस-भाजपची वाढली डोकेदुखी 

बसपाचे निहाल ढोरे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमुळे काँग्रेस-भाजपची वाढली डोकेदुखी 

675

▪️उमेदवारी मागे घेण्यासाठी बड्या नेत्यांनी केलेल्या विनंत्या निहाल ढोरे यांनी फेटाळ फेटाळल्या

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

 ब्रम्हपुरी(दि.21नोव्हेंबर):- आगामी नगरपरिषद निवडणुकीत बहुजन समाज पार्टीकडून रक्तविर सेनेचे संस्थापक/अध्यक्ष निहाल ढोरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केल्यापासून ब्रम्हपुरीच्या राजकारणात मोठा उलथापालथ सुरू झाला आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांमधील पारंपरिक लढतीत आता बसपा जोरदार प्रवेश करीत असून, ढोरे यांच्या उमेदवारीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या निवडणुकीत समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात, अशी चर्चा शहरभर रंगली आहे.

दरम्यान विविध प्रमुख पक्षांसह काही प्रभावी नेत्यांनी उमेदवारी मागे घेण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली असली तरी निहाल ढोरे यांनी ती स्पष्ट शब्दांत फेटाळली. “मी लोकांसाठी उभा आहे, पक्षांसाठी नाही” असे वक्तव्य करत त्यांनी राजकीय वातावरण आणखी तापवले आहे.

निहाल ढोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून, तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता व अवघ्या २५ वर्षाचे युवा उमेदवार म्हणून विशेषतः वाढताना दिसते. रक्तदान उपक्रम, वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका सेवा, अपघातग्रस्तांना मदत आणि नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणे या उपक्रमांमुळे त्यांची प्रतिमा “काम करणारा कार्यकर्ता” अशी झाली आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, ओबीसी, दलित, अल्पसंख्याक आणि नवमतदार वर्गाचा एक मोठा कल बसपाकडे झुकत असल्याने भाजप आणि काँग्रेसच्या पारंपरिक मतबँकेत मोठी पडझड होऊ शकते.

दरम्यान, ढोरे यांच्या “एक वोट, एक नोट” या संकल्पनेलाही शहरात दमदार प्रतिसाद मिळत आहे. घराघरातून मिळणारे प्रोत्साहन, व्हाट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावरील प्रचारामुळे ढोरे यांची मोहीम अधिकच वेग घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.