Home महाराष्ट्र युवा दिग्दर्शक अमर शिंदे महाराष्ट्र कला रत्न पुरस्काराने सन्मानित

युवा दिग्दर्शक अमर शिंदे महाराष्ट्र कला रत्न पुरस्काराने सन्मानित

223

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

▪️खडतर परिस्थितीतून स्वप्नपूर्ती कडे वाटचाल

  म्हसवड(सातारा)(दि.2ऑक्टोबर):-शिवप्रतिष्ठान पुणे यांच्या संयोजनाने पुणे (देवाची आळंदी) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र पुरस्कार सोहळ्यामध्ये पिंगळी बु!! येथील युवा लेखक – दिग्दर्शक अमर शिंदे यांना महाराष्ट्र कला रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    अमर शिंदे यांनी माण तालुक्या सारख्या छोट्या भागात जास्त सुविधा नसताना ही त्यांच्या लेखणी व दिग्दर्शनातून ‘एक अनोखी भेट, पाकळी, फ्रेंडशिप, आस प्रेमाची, हृदयांत, देवाचा मित्र, बेवडेपंती अशा अनेक शॉर्ट फिल्म्स ची निर्मिती केली. तसेच सफर माणदेशी ‘ सारख्या ऐतिहासिक वेबसिरीज मधून माण देशाचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून, कोल्हापूर, कोलकता, बेंगलूर, राजस्थान, दिल्ली असे देशभरातील विविध संस्थांचे जवळपास पंधरा पुरस्कार मिळालेत. 

   तसं पाहिलं तर पिंगळीतील शिंदे घराण्याची जुनी व वेगळी ओळख आहे. आपल्या आजोबांनी जवळपास शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या माडी मध्ये च अमर शिंदे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत अजूनही वास्तव्यास आहेत. आजोबा दाजी शिंदे हे शिक्षक होते व ते उत्तम सुतारकाम ही करायचे. तसेच अमर यांचे मोठे चुलते जनार्दन शिंदे हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आवडते विध्यार्थी व दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक ही होते. असा हा शिंदे घराण्याचा वारसा अमर शिंदे पुढे चालवण्यास प्रयत्नशील आहेत.या पुरस्काराने मिळालेली प्रेरणा व प्रोत्साहन तसेच सहकारी वर्गाची असलेली साथ यामुळे आता एवढ्यावरच न थांबता शॉर्ट फिल्म, वेबसिरीज नंतर आता त्यांचं पुढचं ध्येय हे मराठी चित्रपट असणार आहे. 

    दि. 26 ऑक्टोबर रोजी शिवप्रतिष्ठान च्या वतीने सामाजिक, वैद्यकीय, उद्योजक, क्रीडा, सांस्कृतिक, कला इ. अशा विविध क्षेत्रारातील लोकांचा गौरव करण्यात आला. 

   या दिमाखदार सोहळ्यात शेकडो लोकांच्या साक्षी ने शिवप्रतिष्ठान चे मान्यवर, अध्यक्ष – संस्थापक मा. मदनजी रेनगडे पाटील,जागतिक गिऱ्यारोहक कु.अन्वी घाडगे, डॉ. हेमंत वसेकर (पशुसंवर्धन आयुक्त महाराष्ट्र ), ह.भ.पं. शास्त्री निळोबाराय महाराज थोरात, व सिने – सिरीयल अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांच्या शुभहस्ते अमर शिंदे यांचा आकर्षक ट्रॉफी, मेडल व सर्टिफिकेट फ्रेम देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्या अमर शिंदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.