Home महाराष्ट्र टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पहेलवान तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अड्याळ येथील...

टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पहेलवान तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप

152

▪️टायगर ग्रुपचे पवनी तालुका अध्यक्ष संदीप नरुले यांचा पुढाकार

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)मो:-7066370489

भंडारा(दि.2नोव्हेंबर):-पवनी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे टायगर ग्रुप या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपचे पवनी तालुका अध्यक्ष संदीप नरूले त्यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आले. 

       फळ वाटपाचा कार्यक्रम टायगर ग्रुपचे नागपूर कार्याध्यक्ष मोनु जांगड़े व चंदू वैद्य, बंडू चेटुले, सुधीर सारवे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. सदर फळ वाटपाचा कार्यक्रम भंडारा, पवनी, अड्याळ, तुमसर, कोंढा येथे घेण्यात आला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता टायगर ग्रुप पवनी तालुका अध्यक्ष संदीप नरुले, सुभाष भानारकर, सुमित दिघोरे ,निकेश फुलूरकर, अवि मेश्राम, अमोल नरुले ,ओम चौधरी , निखिल डोंगरे,अविनाश चौधरी, प्रज्वल कोल्हे ,विशाल कामटे, यांनी सहकार्य केले.