Home महाराष्ट्र छ.संभाजीनगर येथे रोटरी क्लब चा ‘शीत शव पेटी’ हस्तांतर सोहळा मोठ्या उत्साहात...

छ.संभाजीनगर येथे रोटरी क्लब चा ‘शीत शव पेटी’ हस्तांतर सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

300

▪️लोकचिकित्सा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दुर्गादास शिंदे यांचा पुढाकार

✒️छ.संभाजीनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 छ.संभाजीनगर(दि.3नोव्हेंबर):-रोटरी क्लब छ. संभाजी नगर पूर्वच्या वतीने आणि रोटरी जिल्हा ३१३२ च्या सीएसआर प्रकल्पांतर्गत शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा आणि सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन ‘शीत शव पेटी’ ( मॉर्च्युरी फ्रीझर बॉक्स) समाजासाठी उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाची संकल्पना मावळते प्रांतपाल रोटेरियन डॉ. सुरेश साबू यांच्या पुढाकारातून साकारली. ओम साई राम स्टील, जालना या संस्थेच्या सि एस आर निधी सहकार्याने छत्रपती संभाजीनगर, जालना व इतर अनेक शहरांमध्ये असे बॉक्स पुरविण्यात आले आहेत.

                                                      या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मावळते प्रांतपाल डॉ. सुरेश साबू यांनी प्रकल्पाची माहिती दिली तसेच रोटरी संस्थेच्या स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सात सेवा क्षेत्रांचा (शांतता व संघर्ष प्रतिबंध, आजार प्रतिबंध व उपचार, पाणी, स्वच्छता व आरोग्य, मातृ व बाल आरोग्य, मूलभूत शिक्षण व साक्षरता, समाज आर्थिक विकास, पर्यावरण संरक्षण बद्दल माहिती उपस्थितांना दिली रोटरी क्लबद्वारे ग्रामीण आणि शहरी समाजासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.     

                                    लोकचिकित्सा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दुर्गादास शिंदे यांनी शीत शवगार बॉक्स समाजासाठी दिल्याबद्दल आभार मानले आणि त्यांच्या संस्थे मार्फत केलेल्या सामाजिक वैद्यकीय, शैक्षणिक, सेवाभावी कार्याची उपस्थितांना माहिती सांगितली. हा बॉक्स सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रसंगी अध्यक्ष रोटेरियन डॉ निवृत्ती गजभारे आणि सचिव रोटेरियन अशोक तोष्णीवाल यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल रो. सुहास वैद्य, रो. रुखमेष जखोटिया, जिल्हास्तरीय पदाधिकारी सहायक प्रांतपाल रोटेरिअन सौ सरिता लोणीकर, श्री विवेक कानडे, क्लबचे संयुक्त सचिव प्रदीप पटेल, रो. राजेश शर्मा, श्री क्षितिज चौधरी, श्री गोविंद दूसंगे, डॉ सतीश भालशंकर, डॉ रमण अदलका आणि शहरातील विविध रोटरी क्लबचे सदस्य तसेच संबंधित परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

       कार्यक्रम तोष्णीवाल कॉम्प्लेक्स, रोटरी कॉर्नर, बँक ऑफ इंडिया समोर, उल्का नगरी, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला. त्यावेळी 

विशाल मोहित, प्रसाद घुले, अभिजित लखुटे, दिपक आहेर, आकाश शिंदे, ज्ञानेश्वर पायगव्हण, सागर तांबे, सागर बनसोड, अनुज अर्बुज, सचिन खंदारे, सम्यक जमधडे, विशाल गोरे, प्रवीण खिल्लारे इत्यादी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते अशी माहिती अनिल जायभाये बीडकर यांनी दिली.