Home अमरावती प्रा. श्रीकृष्ण बनसोड लिखित ‘उद्योगपती महात्मा फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन

प्रा. श्रीकृष्ण बनसोड लिखित ‘उद्योगपती महात्मा फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन

208

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.18नोव्हेंबर):-येथील तेरा समाजप्रबोधनपर पुस्तकाचे लेखक समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांच्या “उद्योगपती महात्मा फुले आणि युवा उद्योजक” या पुस्तकाचे प्रकाशन दि.१९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी : 3.00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, फ्रेजरपुरा, अमरावती येथे लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ. कमलताई गवई यांच्या हस्ते होणार आहे.

                                           प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षा लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ. कमलताई गवई,प्रमुख अतिथी डॉ. रजिया सुलताना, प्राचार्य डॉ.कमलाकर पायस, प्रा.डॉ.सशिला धाबे, प्रवीण घोंगडे (मुख्याध्यापक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय), अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले राहणार आहेत. प्रा.डॉ.सौ. उज्ज्वलाताई मेहरे प्रकाशन समारंभाचे संचालन करणार आहेत.

             या प्रकाशन समारंभाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओमप्रकाश अंबाडकर, निलेश म्हसकर ,चंद्रकांत सुकळकर, इंजि.प्रतीक नावाडे, इंजि.अतुल होले, ॲड.अजय ढोरे,सौ.नंदा बनसोड, सौ.शिल्या खवले, पोलीस पाटील सौ. कविता पाचघरे,सौ.मेघा निमकर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.