Home महाराष्ट्र नाशिक कुंभमेळा वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात गोदावरी स्वच्छता अभियानाचे प्रधानमंत्र्याकडे साकडे

नाशिक कुंभमेळा वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात गोदावरी स्वच्छता अभियानाचे प्रधानमंत्र्याकडे साकडे

116

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

नाशिक(दि.24नोव्हेंबर):-येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली अंदाजे 1700 झाडांची नियोजित कत्तल होणार असल्याची माहिती मिळताच गंगाखेड शहरातील गोदावरी स्वच्छता अभियान आणि विविध पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दिनांक २२ नोव्हेंबर शुक्रवार रोजी गंगाखेड तहसीलदार यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यावरण मंत्री ना.पियुष गोयल यांना वृक्षतोड तात्काळ थांबवावी या मागणीचे निवेदन दिले आले.

तपोवन क्षेत्र हे प्रभू श्रीराम व सीतामाई यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी असून, निसर्गरम्य आणि पर्यावरणीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील परिसर आहे. अशा पवित्र प्रदेशातील झाडे तोडल्यास पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा गंभीर धोका असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पर्यावरणप्रेमींच्या मते, धार्मिक सोहळा भव्य करण्यासाठी निसर्गावर कुऱ्हाड चालवणे अमान्य आहे. आवश्यकता असल्यास, पर्यायी उपाययोजना करून हिरवाईचे रक्षण करणे सरकारचे कर्तव्य आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे, जर वृक्षतोडीचा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही, तर सर्व पर्यावरणप्रेमी नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पडतील.दिलेल्या निवेदनावर गोदावरी स्वच्छता अभियानचे माणिकराव मुंडे,ॲड.राजू देशमुख,गोविंद पुरी,रामप्रसाद ओझा,प्रतिभाताई वाघमारे,रमेश ताकवाले,दिपक जोशी,ॲड.स्मिता देशमुख,ज्ञानेश्वरी लटपटे,दिव्या बंग,प्रभाताई राजेंद्र यांसह अनेक पर्यावरण प्रेमींच्या स्वाक्षऱ्या आहेत.