

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(सातारा)(दि.26नोव्हेंबर):- जि. प. शाळा माणगंगानगर , ता. माण, जि. सातारा येथे आज संविधान दिन उत्साहात साजरा करणेत आला यावेळी चिमुकल्या बालगोपाळानी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून सर्वांचीच मने जिकंली.
यावेळी शिक्षिका दयाराणी खरात यांनी सांगितले मूल्यशिक्षण ही सध्या काळाची गरज बनली आहे बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनावर स्वातंत्र्य समता आणि बंधुता धर्मनिरपेक्ष समाजवादी अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा ठसा उमटवण्याचे काम आणि ते विद्यार्थ्यामध्ये रुजवण्याचे काम चालू असते रोज मी परिपाठाच्या नंतर शाळेत २० मिनिटाची मूल्यवर्धन तासिका घेते शिक्षण तर आपण देतच असतो.
पण त्याआधी माणूस म्हणून विद्यार्थी घडेला पाहिजे हा माझा कटाक्षाने प्रयत्न नेहमीच असतो आणि संविधान तर लोकशाहीचा उत्सव आज मी माझ्या शाळेत विविध घोषवाक्ये सर्व माता पालक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सादरीकरण केले कथा, विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यामध्ये मूल्य रुजवली आहेत आणि ती रुजली आहेत ही विद्यार्थ्यांच्या आचरणावरून त्याची मला प्रचिती येते .







