

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
भंडारा(दि.3डिसेंबर):-पवनी तालुक्यातील अड्याळ येथील मंडई पेठ येथील सांस्कृतिक भवन येथील सभागृहात आज दिनांक 3 डिसेंबर 2025 ला समता दिव्यांग संघटना अड्याळ व आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा यांच्या विद्यमाने जागतिक दिव्यांग व्यक्ती दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे ,ग्रामविकास अधिकारी पौर्णिमा साखरे, पंचायत समिती सदस्या सीमा गिरी ,सामाजिक कार्यकर्त्या ताराबाई कुंभलकर, दिव्यांग पुनर्वसन अधिकारी बांते भंडारा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज ,लुई बेल , डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी, या महान विभूती यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी दिव्यांग कलाकार तुराराम ठाकरे लाखांदूर यांनी दोन्ही हात अपंग असल्याने पायाने तबला पेटी वाजवून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता समता दिव्यांग अध्यक्ष रुपेश तलमले ,उपाध्यक्ष देवचंद बेलखोडे, सचिव चुन्ने, सुयोग फटिक ,व असंख्य दिव्यांग बांधव व भगिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन निधी धुर्वे यांनी केले.







