

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.23डिसेंबर):-न्यू राष्ट्रीय विद्यालय, चिमूर येथे दिनांक स्काऊट गाईड अंतर्गत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, सोबतच वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था, चिमूर चे अध्यक्ष धनराज मालके, मार्गदर्शक म्हणून चिमूर बिटाचे केंद्रप्रमुख भिमटे साहेब, प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी गौरकार तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक खोब्रागडे, विद्यालयाचे पर्यवेक्षक नव्हाते उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री लढी यांचा शैक्षणिक कार्याच्या दखल घेऊन समाजाने समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला, ही बाब शाळेसाठी गौरवास्पद आहे, करिता शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला एकूण 80 विद्यार्थ्यांनी स्टॉल लावलेले होते, यात झुणका भाकर, बासुंदी, कटलेट, आप्पे, दोसा, ढोकळा, इत्यादी विविध पदार्थांची स्टॉल लावण्यात आले.
ह्यात विद्यार्थ्यांनी, पालकवर्ग, शिक्षकवृंद व अतिथीगण यांनी पदार्थांचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान व भविष्यातील येणारा काळ याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन सौ. अश्विनी रोकडे तथा आभार तुषार शंभरकर यांनी मानले. सर्व शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सहकार्य केले.







