

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.23डिसेंबर):- चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या असून ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता घेऊन एकहाती वर्चस्व मिळविला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार योगेश बालाजी मिसार यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुयोग वामनराव बाळबुद्धे यांचा ९१०० मतांनी पराभव करीत दणदणीत विजय मिळवला. योगेस बालाजी मिसार यांना १५४०० मते मिळाली, तर सुयोग बाळबुद्धे यांना ५८३६ मते मिळाली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मिलिंद नानाजी भन्नारे यांना यांना ७३० मते मिळालीत तर चौथे उमेदवार बहुजन समाज पक्षाचे निहाल अंबर ढोरे यांना ८३६ मतांवर समाधान मानावे लागले.
नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी झालेल्या निवडणुकीतही अधिक प्रभागात काँग्रेसने अध्यक्षपदासह २१ जागांवर यश मिळवले. यात भाजपच्या एकमेव उमेदवाराने विजयी संपादन मिळविला. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रभाग क्रमांक ११ मधून अविनाश आनंदराव राऊत यांना १२६६ मते घेऊन एक मतांनी निवडून येऊन विजय मिळविला.
——————–
विजयी उमेदवार
नगराध्यक्ष- योगेश मिसार (काँग्रेस)-१५४०८, प्रभाग क्र. १ (अ) काजल तलमले -१०२२, प्रभाग क्र. १ (ब) चंद्रकांत बावनकुळे-९५३, प्रभाग क्र. २ (अ) बबीता आमले -१४७९, प्रभाग क्र. २ (ब) प्रकाश खोब्रागडे-९३०, प्रभाग क्र. ३ (अ) मनोज कावळे-११०२, प्रभाग क्र. ३ (ब) रेणू ठेंगरे-१२६१, प्रभाग क्र. ४ (अ) अनकुल शेंडे-६७५, प्रभाग क्र. ४ (ब) जयश्री कुथे-६४७, प्रभाग क्र. ५ (अ) सतीश हुमणे-९५३, प्रभाग क्र. ५ (ब) रंजना पिसे-११०४, प्रभाग क्र. ६(अ) हेमलता सिंहगडे -९७१, प्रभाग क्र. ६ (ब) जगदीश (मोंटू) पिलारे-१३९९, प्रभाग क्र. ७ (अ) गीता मेश्राम-९५८, प्रभाग क्र. ७ (ब) सचिन राऊत -८६४, प्रभाग क्र. ८ (अ) पुष्पलता पोपटे-१०१०, प्रभाग क्र. ८ (ब) नितीन उराडे-१२०१, प्रभाग क्र. ९ (अ) मनोज भूपाल (भाजपा) -८३५, प्रभाग क्र. ९ (ब) सपना बल्लारपुरे -९००, प्रभाग क्र. १० (अ) राकेश पडोळे-९९२, प्रभाग क्र. १० (ब) ज्योती राऊत -८०२, प्रभाग क्र. ११ (अ) माधुरी उपासे -२०१५, प्रभाग क्र. ११ (ब) रंजना बुराडे-१९८८, प्रभाग क्र. ११ (क) अविनाश राऊत (राष्ट्रवादी अजित पवार गट)-१२६२







