Home महाराष्ट्र कांकरिया ट्रस्टतर्फे मोफत हृदयरोग व नेत्र तपासणी शिबिर

कांकरिया ट्रस्टतर्फे मोफत हृदयरोग व नेत्र तपासणी शिबिर

164

▪️गरजूंनी या शिबिराचा लाभ घेण्याचे संयोजिका मंजुताई दर्डा यांचे आवाहन

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.12डिसेंबर):-स्व.भोलारामजी कांकरिया यांच्या 49 व्या स्मृतीदिनानिमित्त दिनांक 14 डिसेंबर रविवार रोजी मोफत हृदयरोग व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कार्यक्रमाच्या संयोजिका मंजुताई दर्डा यांनी दि.11 डिसेंबर गुरुवार रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.दर्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या या पत्रकार परिषदेस महेश बँकेचे अध्यक्ष घनश्याम मालपाणी,मंगल अच्छा, नंदकुमार सोमाणी,मनोज नाव्हेकर, रमेश औसेकर आदी उपस्थित होते.

मंजुताई दर्डा यांनी सांगितले की,भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट,गंगाखेड व आनंद ऋषिजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर,अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे ठिकाण राजेश्वर फंक्शन हॉल असून वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे.शिबिरात मोफत हृदयरोग तपासणी,मोफत रक्तातील साखर तपासणी,मोफत ईसीजी,अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया,फेको लेझर शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात येणार आहेत 

या शिबिराचे उद्घाटन जिल्हा पुनर्वसन अधिकारी परभणी प्रतिभा गोरे यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमास पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.हेमंत मुंढे, सहायक पोलिस निरीक्षक दिपाली गित्ते, महेश बँक अध्यक्ष घनशाम मालपाणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रुग्णांची तपासणी व उपचार करण्यासाठी अहिल्यानगर येथील अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सहभागी होणार आहे हृदयरोग तज्ज्ञ डॉ.रविराज गवळी,हृदयरोग तज्ज्ञ डॉ.रविंद्र येळीकर ही टीम संपूर्ण शिबिरादरम्यान रुग्णांना तपासणी व मार्गदर्शन करणार आहे.शहरातील तसेच ग्रामीण भागातील जास्तीत जास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजिका मंजुताई दर्डा यांनी केले आहे.