

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड(दि.12डिसेंबर):-“आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. विध्यार्थ्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर सी. ए./सी. एस. हे प्रोफेशनल कोर्स पूर्ण करून आपल्या कष्टाचे चीज करावे. यासाठी वाणिज्य शाखेचे स्वरूप व सी .ए ./सी .एस परीक्षांचे प्रकार समजून घेणे आवश्यक आहे. अभ्यासात सातत्य ठेवणे महत्वाचे आहे. या परीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांनी अभ्यासाची क्षमता वाढवली पाहिजे.” असे विचार सनदी लेखापाल मा. श्री. राज बदियानी यांनी वेणूताई चव्हाण कॉलेज कराडच्या कनिष्ठ विभागाच्या व्यवसाय मार्गदर्शन मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानाप्रसंगी मांडले. या प्रोफेशनल कोर्सची सर्व माहिती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिल्यामुळे विध्यार्थ्यांच्या ज्ञानात भरच पडली.
याप्रसंगी श्रीमती नम्रता राज बदियानी (सनदी लेखापाल ) यांनीही विध्यार्थ्यांना मेडिटेशनबद्दल सखोल मार्गदर्शन करून आपले मौलिक अनुभव सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात मा. प्राचार्य डॉ. आर. आर. जाधव यांनी वाणिज्य शाखेतील नव्या वाटा व नव्या दिशा शोधल्या पाहिजेत. कारण वाणिज्य शाखेतील विध्यार्थी हे सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करू शकतात. असे विचार मांडले.
प्रा. एस. बी. राठोड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रीमती आर. एस. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रीमती एस. आर. पटेल यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ए. एल. मोरे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास उपप्रचार्य आर. ए. कांबळे, पर्यवेक्षिका एस. एस. मधाळे, प्राध्यापक व विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.







