Home महाराष्ट्र जातीयवादी आणि धर्मांध सरकार सत्तेवरुन खाली खेचणे हीच डॉ. बाबा आढाव यांना...

जातीयवादी आणि धर्मांध सरकार सत्तेवरुन खाली खेचणे हीच डॉ. बाबा आढाव यांना खरी आदरांजली

118

▪️आदरांजली सभेत मान्यवरांचा सूर 

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.13डिसेंबर):-महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ असणारे डॉ. बाबा आढाव यांचे वयाच्या 95 व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले. डॉ. बाबा आढाव केवळ ज्येष्ठ समाजसेवक नव्हते तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते. सामाजिक समतेसाठी उभं आयुष्य पणाला लावणारे संघर्ष नायक डॉ. बाबा आढाव यांचं दुःखद निधन झाल्याने चळवळीतील संघर्षयोध्दा हरपला असे मत आदरांजली सभेत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, आम्ही भारतीय महिला मंच, निर्मिती विचारमंच, सत्यशोधक इतिहास परिषद, सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट, दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आदरांजली सभेचे करण्यात आले होते.

अनिल म्हमाने म्हणाले, डॉ. बाबा आढाव यांनी वंचित कष्टकरी समूहासाठी आयुष्य वेचले. जातीयवादी आणि धर्मांध सरकार सत्ते वरुन खाली खेचणे हीच डॉ. बाबा आढाव यांना खरी आदरांजली असणार आहे. कोल्हापूर आणि डॉ. बाबा आढाव यांचे खूपच जिव्हाळ्याचे संबंध होते.

बबनराव रानगे म्हणाले, उपेक्षित जातीसाठी, त्यांच्या उन्नतीसाठी काम केले. प्रबोधनकार म्हणून त्यांनी आयुष्यभर काम केले. 

लालासाहेब नाईक म्हणाले, त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठी त्यांचे अधुरे काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.

म्हणाले, आपणाला नवा क्रांतिकारी लढा उभा करावा लागेल. 

प्राचार्य डॉ. दिनकर खाबडे म्हणाले, डॉ. बाबा आढाव सामाजिक जाणीवेचे कार्यकर्ते, नेते होते. ते ठरवून सामाजिक सुधारणेकडे वळले.

अ‍ॅड. करुणा विमल म्हणाल्या, डॉ. बाबा आढाव मानवतावादी विचार जगणारे समाजवादी होते. जातीअंताची लढाई तीव्र करणे हीच त्यांना आदरांजली असणार आहे.

सुमेधा सबनीस म्हणाल्या, डॉ. बाबा आढाव समाजवादी विचारांचे पाईक होते. त्यांनी आयुष्यभर तो विचार जपला.

यावेळी संजयकुमार अर्दाळकर, मदन पवार, सुरेश केसरकर, तिमा कोल्हापूरकर, अभिजीत मासुर्लीकर, निवास सरनाईक, शिवाजी बाणेदार, प्रा. एस. डी. माळवी, दिनकर आडसुळ, भीमराव दबडे, पांडुरंग सावंत, भिकाजी कांबळे, अभिजित मसुरलीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.