Home महाराष्ट्र झेंडा मिरवणुकीने पुसेगाव यात्रेस प्रारंभ

झेंडा मिरवणुकीने पुसेगाव यात्रेस प्रारंभ

99

✒️सातारा,खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

 सातारा(दि.16डिसेंबर):-जिल्ह्यातील खटाव तालुका पुसेगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या ७८ व्या पुण्यस्मरणानिमित्त यात्रेला आज रविवार १४ रोजी मानाच्या झेंडा मिरवणूकुने प्रारंभ झाला. सकाळी नऊ वाजता झेंडा मिरवणुक मंदिरातून संवाद्य निघाला 

यावेळी मठाधिपती श्री महंत सुंदरगिरी महाराज व देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख व गौरव जाधव सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील विद्यालय बँड लेझीम ने निर्मल काढत झेंडा यात्रा स्थळावर नेण्यात .आला

या यात्रेनिमित्त १४ ते २४ या कालावधीत विविध स्पर्धा व कार्यक्रम घेण्यात आले असून यामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होतात तसेच बँड पथक ढोल ताशाच्या गजरामध्ये श्री सेवागिरी महाराज की जय घोषामध्ये मानाच्या झेंड्याची मिरवणूक मोठ्या दिमाखामध्ये काढली जाते. मानाचा झेंडा यात्रा स्थळावर गेल्यानंतर या ठिकाणी विधिवत पूजन करून यात्रेला सुरुवात होते. यावर्षी यात्रेचे मोठे व्यापक स्वरूप असून या यात्रेच्या अनुषंगाने श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत पुसेगावच्या वतीने येणाऱ्या भाविकभक्त, यात्रेकरू व व्यावसायिकांसाठी पाणी आरोग्य व स्वच्छता त्याचप्रमाणे इतर सोयी सुविधा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नियोजन केले असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली आहे.