

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.20डिसेंबर):-निर्मिती प्रकाशन, प्रकाशित ज्येष्ठ लेखक आणि माजी सीमाशुल्क अधिकारी मदन पवार, लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावाद आणि धम्म चळवळीच्या अभ्यासिका, अॅड. करुणा विमल, लिखित तथागत बुद्धांचा मानवतावाद या दोन महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवार दि. 21 डिसेंबर, 2025 रोजी दुपारी 1:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी सातारचे ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक व विचारवंत पार्थ पोळके यांच्या हस्ते होणार आहे.
बहुजन साहित्य कला अकादमी, महाराष्ट्र राज्याचे सचिव संभाजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या पुस्तक प्रकाशन समारंभास मा. न्यायाधीश टी. व्ही. नलावडे, प्राचार्य डॉ. डी. आर. भोसले यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
कोल्हापुरातील मानवतावादी लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निर्मिती प्रकाशनचे अनिल म्हमाने, डॉ. शोभा चाळके यांनी केले आहे.







