Home अमरावती कर्मयोगी ज्येष्ठ नागरिक परिवारातर्फे २१ डिसेंबरला प्रा.अरुण बुंदेले यांच्या व्याख्यानाचे आयोजन

कर्मयोगी ज्येष्ठ नागरिक परिवारातर्फे २१ डिसेंबरला प्रा.अरुण बुंदेले यांच्या व्याख्यानाचे आयोजन

59

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.20डिसेंबर):-कर्मयोगी ज्येष्ठ नागरिक परिवार,अमरावती तर्फे बाल संस्कार व ज्येष्ठ नागरिक परिवार,विरूंगळा केंद्र (काळा मारोती जवळ) वि.म.वि.परिसर अमरावती येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा स्मृतिदिन आणि शिक्षणमहर्षी – कृषिमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती सप्ताहानिमित्त दि.२१ डिसेंबर २०२५ ला दुपारी तीन वाजता अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांच्या व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शैलजाताई शंकरराव खोकले (अध्यक्षा,कर्मयोगी ज्येष्ठ नागरिक परिवार),प्रमुख वक्ते साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,प्रमुख अतिथी उपाध्यक्ष श्री मधुकरराव गो.वाकोडे,सचिव प्रा.प्रमोद मु.गावंडे,कोषाध्यक्ष श्री अरुण ना.भेटाळू राहणार आहेत. कार्यक्रमाचे संचालन सदस्य श्री ज्ञानेश्वरराव टोपले करणार आहेत.

          या व्याख्यानाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कर्मयोगी ज्येष्ठ नागरिक परिवार चे सचिव प्रा.प्रमोद मु. गावंडे,सहसचिव प्रा.विद्याधरराव म.मेटकर,सदस्या सौ.मिनाताई मु.गावंडे,सदस्य श्री ज्ञानेश्वरराव बा. टोपले,सदस्य श्री रामदासराव सु.तायडे,सदस्य श्री.अरुण बा. वऱ्हाडे,सदस्य श्री.अशोकराव गो.निंभोरकर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे .