

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
“सौ चुहे खाकर बिल्ली हजको चली” हे आपण ऐकले असेल परंतू सौ चुहे खाकर बिल्ली मातोश्रीको चली, हे आत्ता नव्याने घडत आहे. ही कहाणी आहे अंबरनाथ च्या एका बोक्याची . हा बोका कोण तर ज्याने विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदारकीच्या उमेदवाराकडून १५ लाख रुपये घेऊन पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेश वानखेडे विरोधात काम केले, हे मी कानी कपाळी ओरडून सांगत आलो. आणि मालवणकर हे पुराव्याशिवाय एकही शब्द लिहीत नाही हे सर्वांना ज्ञात आहे. तसा याचा पुरावा माझ्याकडे आहे. या बाबत मी जसे सर्व नेत्यांना व विशेष करून विनायक राऊत साहेबानाही अवगत केले तसेच डॉ. बालाजी किणीकर यांनाही अवगत केले की तुमचा डाटा लीक झाला आहे. कारण राजकीय विरोधक असला तरी त्याच्या पाठीत वार करायचा नाही, ही आम्हाला शिकवण दिली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी!
या नंतर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा प्रचार न करता भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या कमळ या निशाणीला मतदान करण्याच्या बदल्यात प्रत्येक उमेदवाराला भाजपच्या नेत्याकडून दोन दोन लाख मिळवून देणाऱ्यात हा बोकाही होता. त्याचे cc footege ही मिळू शकते. ही हकीकत विनायक राऊत यांना मी कळवली तसेच अन्य माध्यमातून ही संबंधित नेत्यांना कळली. या बोक्याला काढुन टाकण्याचा आदेशही विनायक राऊत साहेबांनी दिला परंतू या बोक्याचा आका त्याच्यावर कारवाई करण्यास धजावत नाही, कारण त्याच्या संमती शिवाय हा बोका एवढे धाडस करणार नाही.
काल हा बोका मातोश्रीवर पोहचला. उमेदवारांची दिशाभूल केली की उद्धव साहेबांचा आशीर्वाद घ्यायला जायचे आहे. आशीर्वाद म्हणजे निवडणूक निधी मिळणार! या आशेने सर्व उमेदवार निवडणूक प्रचार शिगेला पोहचला असताना प्रचार सोडून काल मातोश्रीवर गेले. तिथे या लबाड बोक्याने मखलाशी केली की, यांनी दोन लाख घेतलेले नाहीत. उद्धव साहेबांसोबत स्वतः चा फोटो काढुन तो वायरल केला, त्याचा उद्धेश सफल झाला परंतू दिशाभूल करून नेलेल्यांच्या हाती काहीच लागले नाही, उलट प्रचाराचा एक दिवस वाया गेला. याच बोक्याने जाहीर केले होते की, मी शिवसेना उबाठाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही. त्या प्रमाणे हा लबाड बोका आपल्या वचनाला जागला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंजली राऊत यांचा प्रचार केला नाही की फोटोही लावले नाहीत. अश्या पक्षांतर्गत घरभेद्याना पक्षाने थारा देता कामा नये. काल उद्धवजी सोबतचा फोटो पाहून असे चित्र निर्माण होते की पक्ष अश्या घरभेदिंना मानसन्मान देत आहे. पक्ष प्रमुखांनी काय करावे? हे सांगण्याचा अधिकार मला नाही परंतू वस्तुस्थिती लक्षात आणून देणे हे माझे कर्तव्य आहे व ते मी बजावीत राहणार.







