Home महाराष्ट्र पुसेगाव पॅटर्न श्वान शर्यतीत वाईचा वारसदार 24 प्रथम हिंदकेसरी

पुसेगाव पॅटर्न श्वान शर्यतीत वाईचा वारसदार 24 प्रथम हिंदकेसरी

115

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

पुसेगाव(दि.24डिसेंबर):-जिल्हा सातारा तालुका खटाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या 78 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या श्वान शर्यती वाईच्या सुरेश वाडकर यांच्या वारसदार २४ या श्वानाने अजिंक्यपद पटकावत हिंदकेसरी श्वानाचा किताबाची चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे बक्षीस पटकावले.या श्वान शर्यतीमध्ये उपविजेता होण्याचा मान सिध्देश्वर रेसींग क्लब, कुंभारी येथील शाईन नावाच्या श्वानाने मिळवून ३१ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह प्राप्त केले. 

यावेळी मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज, चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव ,सचिन देशमुख, गौरव जाधव, व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

          पुसेगाव पॅटर्न हिंदकेसरी श्वान स्पर्धेत इतर विजेते पुढील प्रमाणे 3. ⁠अमीरभैय्या शेख,मलकापूर (भुंगा 555)4. ⁠गोल्डन ग्रुप,महाराष्ट्र (सेनोरिटा)5. ⁠बिल्ला ग्रुप,महाराष्ट्र(हिरकणी)6. ⁠बाळूमामाप्रसन्न,इस्लामपूर(रायबा)7पै.शंकरवलेकर,उंबरमळे(कृष्णराज)8. ⁠रॉयल रेसिंगक्लब,आंबेगाव-विटा (रॉयल साक्षी)9. ⁠सेवागिरी प्रसन्न,पुसेगांव (ज्यु. एनर्जी)

10. ⁠टायगर ग्रुप,

मठाधिपती, चेअरमन, सर्व विश्वस्त नेहमी प्रमाणे नावे.

श्वान शर्यत यशस्वी करण्यासाठी कमीटीतील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

  पंच म्हणून पत्रकार संदीप जाधव, स्वाधीन जाधव, पुसेगाव.अजिंक्य महाजन,चितळी.अनिकेत डूबल,ओडोली.वैभव शेडगे, पारगाव.सचिन शिंदे,मायणी यांनी काम पाहिले.

 सौरभ बोंद्रे यांनी सुत्रसंचलन केले तर देवस्थान ट्रस्ट चे सचिन विशाल माने उपस्थित होते

या श्वान शर्यतीमध्ये महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील १९३ श्वानांनी सहभाग नोंदविला होता.

एक ते दहा नंबर च्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते तसेच अकरा ते तीस क्रमांक आलेल्या श्वान मालकांना ही उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.