

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(सातारा ) : सत्कार कार्यक्रमात आयएएस अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग संचालक बिहार हे म्हणाले की बाहेरच्या राज्यात प्रशासनात काम करताना माणदेशी म्हणून आपल्या भागातून जे प्रेम मिळते तीच माझी खरी ऊर्जा आहे. अहिंसा पतसंस्थेने माझा घेतलेला सत्कार हा नक्कीच प्रेरणादायी आहे.
अधिकारी पदावर काम करीत असताना सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो महाराष्ट्रातील काही योजना बिहारमध्ये राबवून महाराष्ट्राचा लौकिक वाढवायचा आहे. शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे व्यथांची जाण मला असल्याने सर्वसामान्यांना न्याय देण्याची माझी भूमिका असते.
यावेळी जगन्नाथ विरकर गुरुजी म्हणाले की अहिंसा पतसंस्था ही या भागात नावाजलेली संस्था असून माझे चिरंजीव विक्रम विरकर हे आयएएस अधिकारी असले व जबाबदारीच्या पदावर काम करीत असले तरी त्यांची मातीशी घट्ट नाळ आहे. बिहार मधील जनतेशी ती नेहमी समरस होत असतात. त्यामुळे जे लोकप्रिय अधिकारी आहेत.
प्रथमतः आयएएस अधिकारी श्री विक्रमजी विरकर यांचा माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिनभाई दोशी यांनी शाल व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला व उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन भाई दोशी म्हणाले की श्री विक्रम विरकर यांनी मुजफ्फर येथील महापालिकेत आयुक्त पदावर जे काम केले ते निश्चितच स्पृहणीय आहे. त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी तेथील जनता अधिकारी व कर्मचारीवर्ग यांनी जे प्रेम दाखवले ते फारच वेगळेपणा जपणारे होते. विरकर साहेबांनी नुकताच बिहार राज्याच्या शिक्षण विभागातील संचालक पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला आहे. त्यांनी या विभागात नाविन्यपूर्ण योजना आणून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल हे दाखवून द्यावे जेणेकरून ही योजना संपूर्ण देशात ‘ विरकर पॅटर्न ‘ म्हणून राबवली पाहिजे. त्यामुळे साऱ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल.
यावेळी या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून गुलाब विरकर, युवा उद्योजक संग्राम विरकर, आकाश विरकर, पतसंस्थेचे व्यवस्थापक दिपक मासाळ, उपव्यवस्थापक प्रशांत आहेरकर, पतसंस्थेचे कर्मचारी व अधिकारी तसेच मसवडमधील सुजाण नागरिक उपस्थित होते..
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाडेकर यांनी केले व आभार आनंदा लिंगे यांनी मानले.







