

▪️शाळेत जुन्या आठवणींना उजाळा देत घेतला स्नेहमिलनाचा आनंद
✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
भंडारा(दि.31डिसेंबर):- जनता शिक्षण संस्था व्दारा संचालित बुटी विद्यालय खमारी (बुटी) येथील सन १९९३-१९९४ ला शिकलेल्या १० वी वर्गाच्या बॅचमधील पुनर्मिलन शिक्षक -शिक्षिका व विद्यार्थी- विद्यार्थिनींचा गेट- टुगेदर कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येऊन बुटी विद्यालय खमारी (बुटी) च्या भव्य परीसरात नुकतेच पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक यु. बी. गजभिये होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य रजनिश बन्सोड, मंडणगाव येथील माजी सरपंच प्रभुजी फेंडर, सेवानिवृत्त शिक्षक एच. एल. रहांगडाले, एस. पी. नाकतोडे, व्हि. टी. बन्सोड, शिक्षिका कांताताई दामले (तिरपुडे), पुष्पा घुटके, रामकृष्ण बेदरकर, रत्नमाला रामटेके, विरेंद्र घुटके, उमाबाई पवनकर, महेंद्र बन्सोड, बुट्टी विद्यालय खमारी येथील लिपिक बाभरे, प्रतिष्ठीत नागरीक किसन ठवकर, सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी ओमप्रकाश मडामे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी परिचर धनराज मेश्राम यांनी शाळेची घंटा वाजवताच ३२ वर्षांनंतर जमलेले शिक्षक -शिक्षिका व विद्यार्थी- विद्यार्थीनी रांगेत उभे राहिले. क्रीडा शिक्षक ए. आर. बन्सोड यांनी आडर दिल्यावर राष्ट्रगीताला सुरूवात झाली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वच्छतेचे पुजारी निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज, स्रिशिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करण्यात आले. सन १९९३-१९९४ च्या बॅचमधील मृत शिक्षक -शिक्षिका व विद्यार्थी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थीनी स्वागत गीताने शिक्षक -शिक्षिका व मान्यवरांचे करण्यात आले.
नंतर सन १९९३-१९९४ च्या बॅचच्या विद्यार्थी- विद्यार्थीनीची हजेरी शिक्षक व्हि. टी. बन्सोड यांनी घेतली आणि विद्यार्थी दशेत असतांना ज्याप्रमाणे बोलत होते. त्याप्रमाणे हजरसर, आलोसर, हजर गुरूजी, तो मामाच्या गावी गेल्यासर अशाप्रकारे विद्यार्थी बोलत होते. उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
हृदयाच्या नाजूक कप्प्यात साठवलेल्या आठवणी तब्बल ३२ वर्षांनंतर त्याच ठिकाणी, सौगंड्यांसोबत, वातावरणात उलगडल्या गेल्या. त्यामुळे भावना शब्दांच्याही पलीकडच्या ठरतात. आठवणींची स्पंदने तशीच साठवत निरोप घेताना अनेकांना गहिवरून आले. मित्र मिलाप हा आगळा वेगळा उपक्रम १९९३-९४ बॅचचे मित्र-मैत्रिणी तब्बल ३२ वर्षांनी पाचवी ते दहावी पर्यंतचे काही शिक्षक भेटल्याने या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बालपण सगळे डोळ्यांसमोर उभे राहिले. जुन्या आठवणींना उजाळा देत जे सध्या हयात नाहीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच दिवंगत विद्यार्थी नरेंद्र बन्सोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. सन १९९३-९४ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल ३२ वर्षांनंतर एकत्र येत स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या स्नेहमेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे माजी विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे लाडके शिक्षक -शिक्षिका ही उपस्थित होते.
त्यावेळी भोजराज मडामे, दिलीप कटणकर, पुष्पा कुथे, तिलोत्तमा घुटके, रत्नमाला बान्ते, रंजना शेंडे विद्यार्थी- विद्यार्थीनी मनोगतात भूतकाळातील आठवणी ताज्या आणि प्रत्येकजण आपल्या हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवलेल्या लहान पणीच्या आठवणी तब्बल ३२ वर्षानी शाळेच्या माजी विद्यार्थी -विद्यार्थिनींनी ताज्या केल्या. दूर दूर गेलेले सर्व जण एकमेकांना भेटत होते व सेल्फी काढत होते. उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास केजरकर व प्रास्ताविक खुशाल शेंडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार विजय बेदरकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वसंता अहिरकर, राकेश मडामे, सुभाष फेंडर, भाऊदास नंदेश्वर, अभिमन कोडापे, शालिक गोमासे, विलास मारवाडे, दिलीप गोटेफोडे, राजू खोब्रागडे, राजेंद्र गजभिये, लालचंद भगत, देवराम मानकर, दुर्वास कोटांगले, योगेश रेहपाडे, अल्का वरकडे, धनराज शेंडे, राजू शनवारे, योगेश आग्रे, दिनेश बन्सोड, मिरा वरकडे, परमानंद थुलकर, गंगाधर नंदूरकर, अंतकला मेश्राम, मंगला शेंडे, कलाबाई केजरकर, वर्षा बागडे, कविता पवनकर, सुनिता बोरकर, देवांगणा किरणापुरे, संजय करवाडे, संध्या बन्सोड, पारस गजभिये, संगिता बांडेबुचे, सविता टेंभुर्णे, सीमा बुरडे, ज्योती बन्सोड, भगवान टेंभुर्णे, मदन बेदरकर, भिका मेश्राम, आशा गोटेफोडे, प्रमोद मेश्राम, लिलावती देशमुख, गणेश पवनकर, इत्यादी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहकार्य केले.







