सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी येथे जागतिक योग दिन साजरा 

38

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.23जून):- जागतिक योग दिनानिमित्त ब्रह्मपुरी येथील सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी येथे शाळेच्या भव्य पटांगणावर विद्यार्थ्यांमध्ये योगा बाबत जागृती निर्माण करत उत्साहात योग्य सत्राचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचे संदेश पोहोचवणारा हा कार्यक्रम उपस्थितत्यांचे मन जिंकून गेला.

 या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक बी एम नगराळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व समजावून सांगत रोजच्या जीवनात योगाचा समावेश गरजेचा आहे हे सहज भाषेत पटवून दिले त्यानंतर सहाय्यक शिक्षक एस. वाय. मेश्राम सर यांनी विविध योगासनाची प्रात्यक्षिक करून दाखवली.शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी पूर्ण उत्साहाने सहभाग घेत योगासने केली.

 कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक बी एम नगराळे सर, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले त्यांचे नियोजन आणि सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रभावी झाला.

 संपूर्ण शाळेचा परिसरात एक सकारात्मक ऊर्जा पसरली होती विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्गदर्शनातून योगाचे मोल आणि सरावाचे महत्त्व समजून घेतले.