Home महाराष्ट्र शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा फुले आणि ओळख कर्तृत्वाची” या पुस्तकाचे ५ ऑगस्ट रोजी...

शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा फुले आणि ओळख कर्तृत्वाची” या पुस्तकाचे ५ ऑगस्ट रोजी प्रकाशन

179

 

अमरावती- (प्रतिनिधी )
.फुले-शाहू आंबेडकर चळवळीतील क्रियाशील समता सैनिक,समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी लिहिलेल्या व सुधीर प्रकाशन वर्धाने प्रकाशित केलेल्या” शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा फुले आणि ओळख कर्तृत्वाची ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार दि.५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता ” कमलपुष्प” काँग्रेसनगर ,अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा लेडी गव्हर्नर प्राचार्या डॉ.कमलताई गवई असून प्रमुख अतिथी डॉ.अनिल सावरकर,डॉ.रजिया सुलताना,प्राचार्य डॉ.कमलाकर पायस,प्रकाशक सुधीर गवळी, प्रा.अरुण बुंदेले आहेत.याप्रसंगी डॉ.अशोक उमप, पोलीस पाटील सौ.कविता नरेंद्र पाचघरे,अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांचा लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ.कमलताई गवई यांच्या हस्ते सात्कार करण्यात येणार आहे.
असे सर्व शाखीय माळी समाज ऋणानुबंध परिवार, वऱ्हाड विकास व माळी समाज बचत गट साईनगर यांनी तथा प्रसिद्ध प्रमुख गोविंदराव फासाटे यांनी फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील समता सैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.