

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.19ऑक्टोबर):-तालुक्यातील तळोधी (नाईक) येथील गुरुदेव कार्यकर्ते निलकंठ लक्ष्मण सुर्यवंशी यांना गुरुकुंज मोझरी आश्रमाकडून नुकतीच ‘ग्रामगीताचार्य’ पदवी प्रदान करण्यात आली. याबदद्ल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अखील भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ आश्रम मोझरी यांच्या वतीने दरवर्षी ग्रामगीता जीवन विकास परिक्षा घेतल्या जाते. त्यामध्ये यंदाचे परिक्षेत निलकंठ लक्ष्मण सुर्यवंशी यांनी ५७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत. सर्वाधिकारी लक्ष्मण गमे, संचालक मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई बोंडे, परिक्षा विभागाचे अध्यक्ष गुलाबराव खवसे, सचिव गोपालदादा कडू व ह.भ.प. प्रा.अशोक चरडे, ग्रामगीताचार्य विठ्ठलराव सावरकर उपस्थित होते. निळकंठ सूर्यवंशी यांना सन्मानपत्र, मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन “ग्रामगीताचार्य” पदवी प्रदान करण्यात आली. सदर परिक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र वाङ्मयम व ग्रामगीतेवर आधारीत असते. त्यांना गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्याचा वारसा असल्यामूळे यश मिळवीता आले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक सावरकर सर, प्रा. चरडे, मुख्याध्यपक जीवतोडे सर व गुरुदेव दादुराम बापुजी यांना दिले. त्याबद्दल गाववासी तसेच तालुका विभाग व पांडुरंग दहिकर विद्यालय तळोधी (ना.) च्या वतीने त्यांचे कौतूकासह अभिनंदन होत आहे.
या यशात मार्गदर्शक नथ्युजी भोयर, गजाननजी ठाकरे, अरविंद देवतळे, आनंदराव कडूकर, मंगेशजी मस्के, प्रा. दादा दहिकर, आशिष कावरे यांचे सहकार्य लाभले.
सूर्यवंशी यांचेवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचा प्रभाव त्यांचे कुटूंबातून पडला आहे, सोबतच चिमूर तालुक्यात बहुतेक गावात गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते आहेत. मात्र तळोधी नाईक या गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अनेकवेळा येऊन गेल्याच्या इतिहास आहे, तालुक्यातील स्वातंत्र संग्राम सैनिकांमध्ये तळोधी नाईक येथिल संख्या जास्त आहे. या गावात जन्मलेले सूर्यवंशी यांना ग्रामगितचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.







