Home Breaking News फुले एज्युकेशन तर्फे श्रीधर गायकवाड झाले सन्मानित

फुले एज्युकेशन तर्फे श्रीधर गायकवाड झाले सन्मानित

200

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.19ऑक्टोबर):-फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन च्या वतीने नवनिर्वाचित पुणे पीपल्स को.ऑफ.बँकेचे श्रीधर गायकवाड यांची बिनविरोध अध्यक्ष पदी निवड झाली म्हणून पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे माजी सचिव डॉ. प्रा.राजेंद्र कांबळे व फुले एज्युकेशनचे अध्यक्ष रघुनाथ ढोक यांचे शुभ हस्ते दि.18 ऑक्टोबर 25 रोजी सकाळी 12 वाजता पुणे मार्केट यार्ड येथील बँकेचे मुख्य कार्यालयात थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र , सावित्रीबाई फुले मराठी व जर्मन ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष नितीन शहा यांचा देखील सन्मान करण्यात आला.

यावेळी पुरंदर ता.पं.समितीचे माजी सभापती दादा घाटे, महात्मा गांधी अध्यापक कॉलेज चे प्राचार्य शिंदे,चारित्र्य प्रतिष्ठान चे सचिव विक्रम शिंदे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मेहत्रे आणि बँकेचे सीईओ संजय भेगडे, डीजीएम मोहन थोरात, अजय राजपूत आणि कैलास पवार उपस्थीत होते. 

यावेळी डॉ.प्रा.कांबळे,प्राचार्य शिंदे व ढोक म्हणाले की श्रीधरजी यांनी अनेक संस्थेचे माध्यमातून नियमित सामाजिक कार्य करीत आहेत.त्यांनी कमी वयात एक यशस्वी उद्योजक म्हणून देखील नाव कमविले आहे. ते पुणे पीपल्स बँकेचे 4 थी टर्म चे संचालक म्हणून गेली 18 वर्ष काम करीत आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्याची कमी वयात अध्यक्ष म्हणून सार्थ निवड केली आहे. त्यांचे हातून अध्यक्षीय कारकिर्द मध्ये नक्कीच बँकेचा मोठा विस्तार , नावलौकिक आणि योग्य कर्जवाटप होईल अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना भावी कार्यास शुभेच्या देण्यात आल्या.

सत्काराला उत्तर देताना गायकवाड म्हणाले की सामाजिक क्रांतीचे जनक असलेले फुले दाम्पत्य यांची फोटोफ्रेम व ग्रंथ भेट देऊन माझा जो सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करीत महात्मा फुले यांचे विविध सामाजिक कार्याची मला जाणीव असल्याने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी बँकेच्या नावलौकिकास कोणतीही बाधा न आणता बँकेचे माध्यमातून समाजाची निस्सिम सेवा करून कर्मचारी आणि सभासद,ज्येष्ठ नागरिक कर्जदार व ठेवीदार यांचा चांगला सलोखा निर्माण करून तत्पर सेवा देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे देखील आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक रघुनाथ ढोक,सूत्रसंचालन विक्रम शिंदे आणि आभार राजेंद्र मेहेत्रे यांनी मानले .