Home महाराष्ट्र प्रभाग क्र. 01मधून इतर मागास वर्गातून निवडणुकीला इच्छुक. डॉ. फेरोज शेख

प्रभाग क्र. 01मधून इतर मागास वर्गातून निवडणुकीला इच्छुक. डॉ. फेरोज शेख

159

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.31ऑक्टोबर):-नगर परिषदचे आरक्षण जाहीर झाले असून प्रभाग क्र. 01हे ओ.बी.सी. पुरुष या प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून, या प्रभागातून गंगाखेड शहरातील तरुमोहल्ला येथील रहिवासी डॉ. फेरोज शेख (BHMS, MD)त्वचारोग या मध्ये प्रॅक्टिस 2008 पासून सेवेत शेख हॉस्पिटल असून,तरुमोहल्ला हा प्रभाग क्र. 01 मध्ये येतो. त्यांचे वडील हाजी गफार शेख हे नगर परिषद चे निवृत्तकर्मचारी आहेत.

तसेच त्यांनी अंत्यत बिकट बिकट परस्थिती आसताना त्यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण करून परिवारामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, वकील, औषधी निर्माण अधिकारी, घडवले असून प्रत्येक क्षेत्रात समाज सेवेला प्राधान्य देतात, बिकट परस्थितीवर मात करून अभ्यासू, सुशिक्षित, सुसंस्कृत कुंटूब म्हणून ओळख निर्माण केली आहे. तसेच राजकारणामध्ये बाळकाका चौधरी यांचे कट्टर समर्थक तथा एक वचणी म्हणून ओळखले जातात. तसेच डॉ. फेरोज शेख व सर्व भावांचा दांडगा जनसंपर्क आहेत.