

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर(दि.23नोव्हेंबर):-शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष आणि नंदराज केटरर्स चे संचालक राजेंद्र उदागे यांना मातृषोक झाला आहे.
केडगाव येथे निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने श्रीमती शशिकला भाऊसाहेब उदागे यांचे निधन झाले.(वय ८२ वर्षे) पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील रहिवासी असलेल्या श्रीमती शशिकला या शांत, मनमिळावू व धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर केडगाव येथील अमरधाम मध्ये शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात्य मुले राजेंद्र व बाळासाहेब, विवाहित मुलगी, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे.







