Home महाराष्ट्र गंगाखेड नगर परिषदेत मकरसंक्रांतनिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

गंगाखेड नगर परिषदेत मकरसंक्रांतनिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

171

▪️९१ महिलांना तिळगुळ व साडीचे वाटप

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.15जानेवारी):-मकरसंक्रांत पर्वाच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड नगर परिषद कार्यालयाच्या वतीने कार्यालयीन महिला कर्मचारी, अधिकारी तसेच कंत्राटी व कायमस्वरूपी महिला स्वच्छता कामगार अशा एकूण ९१ महिलांना तिळगुळ व साडीचे वाटप करून सन्मान करण्यात आला.

लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उपस्थिती
नगर परिषद कार्यालय परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमास नगर परिषदेचे अधिकारी अमोल तांदळे, अधीक्षक रमेश मणियार, महाविर नवले,सुधीर गायकवाड, जालिंदर गायकवाड कर्मचारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते ॲड. मिथिलेश केंद्रे, शिवसेना गटनेते क्षितीज चौधरी, नगरसेवक चंद्रकांत खंदारे, आजीस भाई, सावेर शेख, विशाल मुंडे, सुनिल चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिला कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक
या प्रसंगी मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत महिला कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कार्यातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. कार्यक्रमास पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर परिषदेच्या या उपक्रमाचे शहरात सकारात्मक स्वागत होत आहे.