

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.17जानेवारी):- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागातर्फे विद्यार्थिनींसाठी दि. 15 जानेवारी, 2026 रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी *व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे* आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. के. एन सोनवणे उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ते जळगाव येथील शिक्षण, संशोधन व ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय एजाज एम. शेख विभागीय प्रकल्प अधिकारी तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम बागुल, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, पर्यवेक्षक ए. एन बोरसे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार, युवतीसभा प्रमुख व सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. प्रिती रावतोळे, सहा. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आर.आर.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. प्रिती रावतोळे यांनी केले.
यावेळी प्रमुख वक्ते एजाज एम. शेख यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्तीमत्व खुलवण्यासाठी आपले हावभाव, शरीराची ठेवण, बोलण्याशी शैली कसी असावी? व त्या वरून समोरील व्यक्ती कशी आहे? हे आपण ओळखू शकतो, याबात सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विविध उदाहरणे दिली व त्याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. आरोग्य, सकारात्मक विचारसरणी, प्रामाणिकपणा, परिपूर्ण ज्ञान, कठोर परिश्रम, वेळेचे व्यवस्थापन, आवड जोपासणे, एकाग्रता, आकर्षणाचा नियम, कंपन वारंवारता, ध्यान, घेतलेले काम पूर्णत्वाला नेणे, प्रतिकूल परिस्थिती वर मत करणे हे १२ मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिले, ज्या माध्यमातून ते जीवनात यशस्वी होवू शकतात.
याप्रसंगी प्रा. डॉ. के. एन सोनवणे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, प्रभावी संवादकौशल्य ही आजच्या नवीन शैक्षणिक धोरणात अतिशय महत्वाचा पैलू आहे. त्यासाठी विद्यार्थी विकास विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी एक मेजवानीच आहे असे उदगार काढले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ आर आर पाटील यांनी केले तर वक्त्यांचा परिचय डॉ.डी.डी.कर्दपवार यांनी करून दिला तसेच आभार डॉ. सौ. क्रांती क्षीरसागर यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.डी.डी कर्दपवार, डॉ आर आर पाटील, डॉ. एम.एल. भुसारे, गोपाल वाघ, निरंजन पाटील, दर्शन पाटील, धनंजय चौधरी, जितेंद्र कोळी, निलेश भाट, विशाल पाटील यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी सौ. सुनिता पाटील, सौ. सुनंदा नन्नवरे , श्री संदीप पाटील, विशाल खैरनार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







