

▪️मुख्य मार्गदर्शक डॉ. शीतल पिंपळेकर, डॉ. सोनोपंत जोशी सर, डॉ. (कर्नल) अश्वनी कुमार शाक्य सर, डॉ. सीता देवी मॅडम, जसनीत कौर मॅडम, डॉ. मंगेश जाबडे सर, शिला उपेंद्र मॅडम,जेसी भिडे मॅडम, जीजो थॉमस सर, शुभम सोनटक्के सर
✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
पुणे(दि.23जानेवारी):-सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) अंतर्गत कार्यरत सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंग (SCON) यांनी सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (SUHRC), पुणे येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा यशस्वीपणे आयोजित केली होती.
ही कार्यशाळा SCON च्या प्राध्यापकवर्ग व एम.एस्सी. नर्सिंग द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांद्वारे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज फॉर वूमन (SMCW) आणि सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल (SUHRC) यांच्या सहकार्याने, SUHRC मधील नर्सिंग ऑफिसर्स साठी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सर्व नर्सिंग ऑफिसर्स यांनी सक्रिय सहभाग नोंदविला संपूर्ण कार्यशाळेचे आयोजन सचिव डॉ. शीतल पिंपळेकर, सहयोगी प्राध्यापक, सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली पार पडली.
कार्यशाळेची संकल्पना (थीम) “Beyond Preparedness: Building Resilient Healthcare Systems and Communities for Disasters” अशी असून, आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीतील प्रतिसाद व पुनर्वसन प्रक्रियेमध्ये परिचारिकांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी झाली त्यानंतर “Disaster Preparedness: Role of Nurses” या विषयावर डॉ. सोनोपंत जी. जोशी, संचालक, सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंग, पुणे यांनी पहिले सत्र घेतले.
उद्घाटन सत्रात डॉ. सोनोपंत जी. जोशी सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले त्यानंतर दीपप्रज्वलन समारंभ पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. (कर्नल) अश्वनी कुमार शाक्य, प्रमुख, हॉस्पिटल प्रशासन, SMCW व SUHRC यांनी उपस्थित नर्सिंग ऑफिसर्स यांना संबोधित करत त्यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी आंतरव्यावसायिक सहकार्याद्वारे रुग्णालयीन तयारी बळकट करण्यावर भर दिला उद्घाटन सत्राचा समारोप सौ. जेसी भिडे मॅडम, नर्सिंग सुपरिंटेंडंट, सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज फॉर वूमन (SMCW) आणि सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल (SUHRC) यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यानंतर समूह छायाचित्र काढण्यात आले.
यानंतरच्या तांत्रिक सत्रांमध्ये डॉ. सीता देवी, प्राध्यापक, SCON यांनी “Use of Technology and Apps in Disaster Management” या विषयावर दुसरे सत्र घेतले. तिसरे सत्र “Community-Based Disaster Preparedness and Risk Reduction” या विषयावर डॉ. जसनीत कौर, प्राध्यापक, SCON यांनी सादर केले.
चौथे सत्र, ज्यामध्ये आपत्तीतील सिम्युलेशन-आधारित प्रशिक्षण व ट्रायाज प्रतिसाद यावर भर देण्यात आला, हे डॉ. शीतल पिंपळेकर, सहयोगी प्राध्यापक, SCON; डॉ. मंगेश जाबडे, सहाय्यक प्राध्यापक, SCON; तसेच श्री. शुभम सोनटक्के, नर्सिंग एज्युकेटर, SMCW व SUHRC यांनी संयुक्तपणे घेतले. या सत्रामध्ये आपत्तीच्या वेळी प्रत्यक्ष प्रतिसाद देण्याबाबत व्यावहारिक मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेचा समारोप समारोप सत्र व ई-प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाने करण्यात आला. ही कार्यशाळा सहभागी नर्सिंग अधिकाऱ्यांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसादास पात्र ठरली असून, आपत्ती व्यवस्थापनातील कौशल्ये वृद्धिंगत करण्यास व सक्षम, प्रतिसादक्षम आरोग्यसेवा प्रणाली निर्माण करण्यासाठी संस्थात्मक बांधिलकी दृढ करण्यास मोलाची ठरली *अशी माहिती नर्सिंग सहव्यवस्थापक जिजो थॉमस यांनी दिली*.







