Advertisements
✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमुर(दि.22ऑगस्ट):-तालुक्यातील आंबोली येथील स्व. बालाजी ठाकरे यांचा जन्मदिवस निमित्ताने आंबोली चौरस्ता येथे युवा मंच चा वतीने स्वचत्ता अभियान व वृक्षारोपण कण्यात आले.
“मरावे परी किर्ती रुपी उरावे ” ही संकल्पना घेऊन आणि युवा मंच आंबोली च्या तत्वानुसार स्व.बाबाजी बापूराव ठाकरे(सावकार) यांच्या जन्मदिवसनिमित्त्य चौरस्ता(आंबोली)वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमित युवा मंच आंबोली तर्फे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्वच्छता अभियान व वृक्षारोपण करतांना नंदू ठाकरे , काकडे ताई ,शरद वांढरे , दीपक लाकडे , आशिष चौधरी , शुभम मंडपे , दीपक जुमडे , मधूकरजी नागपुरे , सुरेशजी गरमडे अभिलाष भसारकर उपस्थित होते.