Home Breaking News मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मांडवा येथे बांधला बंधारा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मांडवा येथे बांधला बंधारा

118

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.1जानेवारी):- पंचायत समिती पुसद अंतर्गत येत असलेल्या मांडवा ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत १७ सप्टेंबर २०२५ पासून लोकसहभागातून विविध उपक्रम राबविल्या जात आहे. त्याचाच भाग म्हणून लोकसहभागातून नाल्यावर बंधारा बांधण्यात आला.

 गावाच्या नजीकच असलेल्या नाल्यावर माती, दगड, यांच्या साह्याने बांधलेल्या बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत तर होईल. 

 यावेळी उपसरपंच विजय राठोड, ग्रामविकास अधिकारी एस. टी. तडसे, रमेश ढोले, कैलास राठोड, विठ्ठल आडे, ग्राम रोजगार सहाय्यक बाळु धाड,नारायण घावस,ग्रामपंचायत कर्मचारी प्रदुम्न आबाळे, व राहुल जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.