

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.8जानेवारी):-उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने व्हॉईस ऑफ मिडिया गंगाखेड शाखेच्या वतीने पत्रकारांचे व कुटुंबीयांचे आरोग्य तपासणी शिबाराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी पत्रकार दिनाचे निमित्त बोलताना या कार्यक्रमाचे अध्येक्ष डॉक्टर हेमंत मुंडे म्हणाले की आम्ही डॉक्टर मंडळी नागरिकांच्या बिघडलेल्या आरोग्याची काळजी घेऊन ते तंदुरुस्त करत असतो.
परंतु या बिघडलेल्या समाज व्यवस्थेचा आरोग्य सुधारायची जबाबदारी मात्र पत्रकारावर आहे.आणि पत्रकारही ते जबाबदारी आपआपल्या परीने पार पाडत असतात. समाजातल्या बिघडलेल्या व बिगडत असलेल्या गोष्टी नकारात्मक व सकारात्मक दृष्टीने पत्रकारच या व्यवस्थेकडे पोहोचत असतो त्या दृष्टीने मग उपाययोजना केल्या जातात जी मान्य करावे लागेल पण समाजमन बदलण्याची मोठी जबाबदारी, पत्रकारांकडून होते हे मान्य करावे लागेल.
आत्ताच्या परिस्थितीत पत्रकाराकडून सामान्य माणसाच्या अपेक्षा वाढल्यात असल्या मुळे समाजाचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी झटणाऱ्या पत्रकारांचे स्वास्थ्य व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे आज पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेने केले ही गोष्टच आनंद दायी आहे.
यावेळी या आरोग्य तपासणी शिबिराच्या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर तहसीलदार श्रीमती उषाकिरण शृंगारे गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हेमंत मुंडे बालरोग तज्ञ डॉक्टर केशव मुंडे डॉक्टर चट्टे डॉक्टर कालिदास निरस जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आर एम ओ डॉक्टर कदम डॉक्टर जाधव महसूल सहाय्यक सुनील चापळे डॉक्टर प्रतीक्षा बडे आधी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांच्या वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या या यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया चे तालुकाध्यक्ष अन्वर शेख लिंबेकर, अनिल साळवे,अंकुश कांबळे, भागवत जलाले, अली चाऊस, शिवाजी, शेख माहेमूद, कांबळे, राजेश वटमवार, गंगाधर कांबळे, उत्तम दसवंते, मोहसीन खान, राम पवार, रामप्रसाद ओझा, ज्ञानोबा कदम, राम पवार, आदी पत्रकार उपस्थित होते.







