Home Breaking News गोल्डन ड्रिम्स इंग्लिश स्कूलम तर्फे, पत्रकारांचा गौरव व क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ

गोल्डन ड्रिम्स इंग्लिश स्कूलम तर्फे, पत्रकारांचा गौरव व क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ

136

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.9जानेवारी):- येथील गोल्डन ड्रिम्स इंग्लिश स्कूल तर्फे मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत दिनांक ८ जानेवारी गुरुवार रोजी पत्रकारांचा सन्मान सोहळा तसेच पत्रकारांच्या हस्ते क्रीडा महोत्सव शुभारंभ करण्यात आला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उपस्थित पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज,मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.तसेच क्रीडा महोत्सवाचे उदघाटन मशाल पेटवून करण्यात आली.कार्यक्रमास शाळेच्या संचालिका प्रा.डॉ.कविता सावंत(साळवे) मुख्याध्यापक श्रवणकुमार देवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यानंतर उपस्थित पत्रकार अन्वर शेख लिंबेकर,रामप्रसाद ओझा,शिवाजी कांबळे,अनिल साळवे,सय्यद गौस,राहुल डोंगरे,भागवत जलाले,अंकुश कांबळे,गंगाधर कांबळे,मकरंद चिनके,महेमूद शेख यांचा शाळेच्या संचालिका डॉ.कविता सावंत(साळवे) मुख्याध्यापक श्रवणकुमारदेवी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्टील बॉटल देऊन गौरव करण्यात आला.यावेळी समाजातील घडामोडी निर्भीडपणे मांडत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांचे योगदान अतुलनीय असल्याचे मत शाळेच्या संचालिका प्रा. डॉ.कविता सावंत (साळवे) यांनी व्यक्त केले.

यावेळी पत्रकार रामप्रसाद ओझा, अन्वर शेख लिंबेकर यांनी पत्रकार दिनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच मनमोकळा संवाद साधला आणि क्रीडा सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या.दि.०८ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत क्रीडा स्पर्धा चालणार असून आयोजित क्रीडा सप्ताहमध्ये कब्बडी,खोखो,रनिंग रेस,हर्डल रेस,सायकल रेस,क्रिकेट,लाँग जंप,गोळा फेक यांसारख्या इनडोअर खेळांचे आयोजन करण्यात आले असल्याचे क्रीडा शिक्षक राहुल राठोड यांनी दिली.

या कार्यक्रमास शिक्षकवृंद, कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सुनील मूजमुले यांनी केले तर आभार प्रदर्शन अस्लम शेख यांनी मानले संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला कार्यक्रम यशवितेसाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले