Home चंद्रपूर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

149

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.5जानेवारी):-स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका व पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीचा कार्यक्रम नेवजाबाई हितकारिणी माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रम्हपुरी येथे शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मा. श्री. एन. डब्ल्यू. नाकाडे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक पी. आर. जीभकाटे सर उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक वदनलवार सर, बारापात्रे सर, मंगर सर, तसेच ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय मराठे , कलकोटवार , खाडीलकर यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर विविध शिक्षकांनी आपल्या मनोगतांतून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

या प्रसंगी आदरणीय बालपांडे , सातपुते , मराठे , उरकुडे , खाडीलकर , तसेच प्रा. डॉ. पंकज बेंदेवार सर आणि गायकवाड सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्रांतीतील योगदान, सामाजिक सुधारणा कार्य, स्त्री-शिक्षणासाठी केलेला संघर्ष आणि त्यांचे विचार प्रभावी शब्दांत मांडले.

अध्यक्षीय भाषणात एन. डब्ल्यू. नाकाडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. त्यांच्या विचारांवर चालत विद्यार्थ्यांनी शिक्षण, समता व मानवतेचे मूल्य आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमातून प्रेरणा घेतल्याचे दिसून आले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण मेश्राम सर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन राहुल गावतुरे सर यांनी केले.