Home अमरावती प्रा.अरुण बुंदेले यांची शिक्षक साहित्य संमेलनातील कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

प्रा.अरुण बुंदेले यांची शिक्षक साहित्य संमेलनातील कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

94

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.5जानेवारी):- येथील अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले (अध्यक्ष कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान) यांची श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय,अमरावती येथे दि.10 व 11 जानेवारी 2026 रोजी संपन्न होणाऱ्या शिक्षक साहित्य संमेलनातील कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.ही निवड नुकत्याच अमरावती येथे झालेल्या शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्तरीय सभेत जाहीर करण्यात आली. या सभेचे अध्यक्ष श्री जयदीप सोनखासकर (अध्यक्ष ,शिक्षक साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य ) होते.सभेस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून शिक्षक साहित्य संघाचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवडीबद्दल राज्याध्यक्ष श्री जयदीप सोनखासकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रा.अरुण बुंदेले यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

      प्रा.बुंदेले यांची सामाजिक व शैक्षणिक विषयावरील अकरा पुस्तके प्रकाशित झालेली असून ‘निखारा ‘आणि ‘ अभंग तरंग ‘ हे दोन परिवर्तनवादी काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.

            प्रा.अरुण बुंदेले यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह अनेक साहित्य संमेलनातील कवी संमेलनातून आपल्या परिवर्तनवादी कवितांचे व काव्यगीतांचे दमदारपणे सादरीकरण केलेले आहे.

      शिक्षक साहित्य संमेलनातील कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.