Home महाराष्ट्र पुसेगावात यात्रास्थळावर स्वच्छता मोहीम

पुसेगावात यात्रास्थळावर स्वच्छता मोहीम

111

▪️डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, ट्रस्ट, विद्यार्थी व ग्रामस्थांचा सहभाग 

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

 पुसेगाव ता. खटाव जि. सातारा येथील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भरविण्यात आलेल्या यात्रा प्रदर्शनात रथोत्सव आणि विविध सांस्कृतिक, क्रिडा, धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे झाले. या कालावधीत यात्रास्थळावर आणि सार्वजनिक ठिकाणी झालेल्या कचऱ्याची स्वच्छता मोहीम आज शनिवारी राबविण्यात आली.

         पुसेगाव यात्रेत सलग दोन आठवडे लाखो भाविक-भक्तांनी तसेच यात्रेकरूंनी हजेरी लावली होती. खेळण्यांची, सौंदर्यप्रसाधनांची शेकडो दुकाने आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते. तब्बल पंधरा दिवसांच्या कालावधीत यात्रास्थळावर मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता. कचरा व टाकाऊ घटकांपासून पुसेगाव मधील ग्रामस्थांना काही त्रास होऊ नये, आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नयेत याची दक्षता घेऊन देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने यात्रा स्थळावर ही स्वच्छता करण्यात आली.

या स्वच्छता मोहीमेत डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य, गावातील शाळां-कॉलेज मधील विद्यार्थी यांच्यासोबत देवस्थानाचे मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज, चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने, प्रभारी सरपंच विशाल जाधव व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

फोटो ओळ : पुसेगाव : यात्रास्थळावर मोठ्या उत्साहात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.