Home महाराष्ट्र दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UG, PG व Diploma स्तरावर स्वतंत्र शिष्यवृत्ती व निर्वाह भत्ता...

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UG, PG व Diploma स्तरावर स्वतंत्र शिष्यवृत्ती व निर्वाह भत्ता तातडीने सुरू होणार

199

▪️चेतक युथ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष गोपाल पवार यांचा यशस्वी पाठपुरवठा

✒️अनिल जायभाये बीडकर(विशेष प्रतिनिधी)मो:-9011772189

मुंबई(दि.11जानेवारी):-महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी वाढवण्यासाठी UG, PG व Diploma अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र, सर्वसमावेशक शिष्यवृत्ती योजना व निर्वाह भत्ता तातडीने सुरू करण्यात यावा अशी मागणी चेतक युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. गोपाल पवार यांनी केली होती.

या संदर्भात चेतक युथ फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांना दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी सविस्तर निवेदन सादर करण्यात आले होते. त्यास शासनाकडून प्राप्त उत्तरानुसार,

सध्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतरोत्तर (Post-Matric) शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जात असून, त्या योजनेत सुधारणा करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

 मात्र, गंभीर बाब अशी आहे की

आजही महाराष्ट्रात UG, PG व Diploma स्तरावर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक शिष्यवृत्ती योजना तसेच निर्वाह भत्ता योजना अस्तित्वात नाही यामुळे अनेक होतकरू दिव्यांग विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात.

याबाबत बोलताना संस्थापक अध्यक्ष गोपाल पवार म्हणाले की “दिव्यांग विद्यार्थ्यांना केवळ 4% आरक्षण देणे पुरेसे नाही 

त्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी आर्थिक पाठबळ, निर्वाह भत्ता आणि शिक्षणातील समान संधी मिळणे अत्यावश्यक आहे जोपर्यंत UG, PG व Diploma स्तरावर स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू होत नाही, तोपर्यंत सामाजिक समावेश पूर्ण होऊ शकत नाही.”

 चेतक युथ फाउंडेशनच्या खालील ठाम मागण्यांना राज्य शासनाने ताबडतोब सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाही करण्याची हमी दिली असून त्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत 

1. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UG, PG व Diploma स्तरावर 100% शिष्यवृत्ती योजना

2. शिक्षण काळात निर्वाह भत्ता मंजूर करणे

3. उच्च शिक्षणात समान, सन्मानजनक व सर्वसमावेशक संधी

4. विद्यमान Post-Matric शिष्यवृत्ती योजनेचा व्याप्ती विस्तार

तरी चेतक युथ फाउंडेशनच्या वरील सर्व मागण्या राज्य सरकार तात्काळ मंजूर करणार आहे.