Home Breaking News दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचे पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचे पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

135

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.11जानेवारी):-महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात आज दि.10 जानेवारी 2026 रोजी आयोजित ‘वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून बोलतांना चोपडा येथील साईबाबा हॉस्पिटलच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सौ. योगिता काटे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, ‘शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्वाचा आहे. आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्नशील असावे. यशस्वी होण्यासाठी वेळेला महत्व, वेळेचे नियोजन, गुणवत्ता वाढीवर भर देणे आवश्यक आहे.’

   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळ,चोपडा नियामक मंडळाचे सदस्य यशवंत खैरनार,  प्रमुख मार्गदर्शक व चोपडा येथील साईबाबा हॉस्पिटलच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. योगिता काटे तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ.ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ, उपप्राचार्य पी.एस.पाडवी व पर्यवेक्षक व स्नेहसंमेलन प्रमुख ए. एन. बोरसे, स्नेहसंमेलन प्रमुख व्ही. पी. हौसे आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी राज्यस्तरीय करंडक व पारितोषिक प्राप्त ‘सेकंड हॅन्ड’ या एकांकिकेचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.या एकांकिकेतून मोबाईलच्या अति वापराच्या दुष्परिणामातून उद्भवलेल्या समस्या, प्रेमभंग, त्यातून निर्माण झालेल्या वैवाहिक समस्या, स्त्री स्वातंत्र्य यावर प्रकाश टाकला. यातून विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक संदेश दिला.

   यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बी. एम. सपकाळ, डॉ. सौ. पी. एम. रावतोळे, डॉ. एल. बी. पटले, डॉ. एम. एल. भुसारे यांनी केले तर संगीत शेलापागोटेचे सूत्रसंचालन चेतन बाविस्कर यांनी केले.

        तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते क्रिकेट, हॉलीबॉल, मेहंदी, रांगोळी, व्यंगचित्र,चित्रकला,पारंपारिक  वेशभूषा, रॅम्प वॉक, क्रिकेट, पाककला, आनंद मेळावा, विविध खेळ व नाटिका, पथनाट्य, एकल नृत्य, समूह नृत्य, आदिवासी नृत्य, कॉमेडी शो,सुगम गायन, समूह गायन, गीत गायन, शेला पागोटे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा स्पर्धा व अन्य विविध स्पर्धांमधील विजेत्यांना तसेच NSS विभागातील उत्कृष्ट स्वयंसेवक, NCC व क्रीडा विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात  आले.  

       यावेळी क्रिकेट स्पर्धेत विजेत्या वरीष्ठ महाविद्यालयीन संघास (शिक्षक कर्मचारी) व उपविजेत्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघास (शिक्षक कर्मचारी) तसेच तृतीय पारितोषिक शिक्षकेत्तर कर्मचारी संघास पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तर मुकेश पाटील याना ‘मॅन ऑफ दी मॅच’ व मॅन ऑफ दि सिरीज प्रतीक पाटील यांना  प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे निवड झालेल्या जागृती बारी हिचा गौरव करण्यात आला.

यावेळी अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी केले.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. बी.एम. सपकाळ, डॉ. सौ. के. एस. क्षीरसागर, डॉ. डी. एस. पाटील व सौ. विशाखा देसले यांनी केले तर आभार कनिष्ठ विभाग वार्षिक स्नेहसंमेलन प्रमुख व पर्यवेक्षक ए. एन. बोरसे यांनी आभार मानले.

    कार्यक्रमानंतर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार वितरित करण्यात आला.

      या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, उपप्राचार्य,  समन्वयक,  पर्यवेक्षक व स्नेहसंमेलन प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समिती प्रमुख, सदस्य तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी  उपस्थित होते.