Home अमरावती शिक्षक साहित्य संमेलन म्हणजे शिक्षकांमधून साहित्यिक घडविणारा विचारमंच-प्राचार्य डॉ.विनय राऊत

शिक्षक साहित्य संमेलन म्हणजे शिक्षकांमधून साहित्यिक घडविणारा विचारमंच-प्राचार्य डॉ.विनय राऊत

104

▪️दोन दिवशीय ९ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोपीय सत्कार समारंभ संपन्न

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.20जानेवारी):- ” बी.एड.चा अभ्यासक्रम हा केवळ पुस्तकी ज्ञान मिळवण्याचा काळ नसून तो खऱ्या अर्थाने ‘ आदर्श शिक्षक’ घडण्याचा काळ असतो.जयदीप सोनखासकर यांनी निर्माण केलेलं हे शिक्षक साहित्य संमेलन विचारपीठ वैचारिक 

देवाणघेवाणीचा मोठा विचारमंच आहे.विद्यार्थांच्या सृजनशीलतेचा विकास येथे आलेल्या साहित्यिक शिक्षकांमधून होऊ शकतो.या संमेलनात सहभागी झालेले अनेक शिक्षक स्वतः लेखक, कवी किंवा नाटककार आहेत. शिक्षक साहित्य संमेलन म्हणजे शिक्षकांमधून साहित्यिक घडविणारा विचारमंच आहे .या शिक्षक साहित्य संमेलनातीलचर्चासत्रे, एकपात्री प्रयोग,मुक्त संवाद, कथाकथन, ग्रंथदिंडी, परिसंवाद आणि कवीसंमेलने हे सर्वच कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेले आहेत. पूर्णपणे यशस्वी झाले असे मला वाटते .”असे विचार प्राचार्य डॉ. विनय राऊत यांनी व्यक्त केले.

      ते मातोश्री विमलाबाई देशमुख साहित्य नगरी श्री.शिवाजी शिक्षण महाविद्यालय,अमरावती येथे

दि ११ जानेवारी २०२६ ला संपन्न झालेल्या ९ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोपीय सत्कार समारंभाच्या अध्यक्ष पदावरून विचार व्यक्त करीत होते.

       समारोपीय सत्राच्या पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विनय राऊत (श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय, अमरावती) तर प्रमुख अतिथी संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.गणेश चव्हाण,प्रा.डॉ.पृथ्वीराजसिंह राजपूत, संघर्ष सावरकर, मा.जयदीप सोनखासकर, प्रा.अरुण बुंदेले,मा.शरदचंद्र बिडकर,प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे,प्रा.किशोर क्षत्रीय होते.

         अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन राज्याध्यक्ष जयदीप सोनखासकर, राजेंद्र भटकर , गजेंद्र पाथरे यांनी स्वागत केले .

            या सत्कार समारंभात लोकनेते, साहित्यिक, संपादक, निसर्गवासी भाई प्रभाकरराव सावरकर स्मृती राज्यस्तरीय शिक्षक साहित्यरत्न पुरस्कार प्रा.प्रतीक पाथरे व मा. शिवा काळे यांना सन्मानपूर्वक देण्यात आला.

          याप्रसंगी अनेक गुणवंत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

        याप्रसंगी प्रमुख अतिथी संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.गणेश चव्हाण,प्रा.डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत,संघर्ष सावरकर यांनी मनोगत व्यक्त केले.शिक्षक साहित्य संघाचे राज्याध्यक्ष मा.जयदीप सोनखासकर यांनी ठराव वाचन केले.

     या कार्यक्रमाचे संचलन प्रा. डॉ. मदाताई नांदुरकर तर आभार सुरेश मडावी यांनी मानले.