

▪️अनिल जायभाये बीडकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
✒️माळाकोळी,नांदेड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नांदेड(दि.27जानेवारी):-महाराष्ट्र शासनाने या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात कॉपीमुक्त परीक्षा अभियान महाविद्यालय व शाळा स्तरावर (इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षा कॉपी मुक्त) घेण्याचा निर्णय घेतला आहे,त्यानुसार संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविद्यालय, माळाकोळीच्या 12वीच्या विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची शपथ घेतली.
संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविद्यालय माळाकोळी, ता . लोहा, जि.नांदेड येथे इयत्ता 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारीपासून सुरू असून प्रात्यक्षिक परीक्षेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा देण्याची शपथ घेतली, त्यावेळी अनिल जायभाये बीडकर सरांनी 12 वी नंतर परिचर्या (नर्सिंग) क्षेत्रातील विविध संधी आणि आरोग्याचे महत्त्व या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच प्राचार्य एस. एस. मुंडे सर यांनी भयमुक्त आणि कॉपी मुक्त परीक्षा कशी द्यायची याचे मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. श्रीमती निर्मला गायकवाड मॅडम, प्रा. नामदेव मोरे सर, प्रा. शिवाजी मुंडे सर, प्रा. ज्ञानेश्वर बिडवई सर , प्रा. दिलीप मुंडे सर, प्रा.युसूफ शेख सर , परमेश्वर केंद्र सर , अनिल घुगे सर, क्लार्क आकाश होनराव सर यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भागवत गोरे सर यांनी केले.







