Home महाराष्ट्र शिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत वेणूताई चव्हाण कॉलेजच्या ‘संगम’ला तृतीय क्रमांक 

शिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत वेणूताई चव्हाण कॉलेजच्या ‘संगम’ला तृतीय क्रमांक 

140

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.4फेब्रुवारी):- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मार्फत दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व सृजनशिलतेच्या विकासासाठी संलग्न महाविद्यालयाअंतर्गत नियतकालिक स्पर्धे आयोजित केल्या जातात. शैक्षिणक वर्ष 2023-24 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून सदर स्पर्धेत श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या “संगम” या  नियतकालिकास शिवाजी विद्यापीठस्तरीय “तृतीय” क्रमांक प्राप्त झाला. वार्षिक नियतकालिकाची  रचना, मांडणी, मुखपृष्ठ, छपाई,  अंकातील लेखन आदी निकषावर मूल्यमापन होऊन सदर स्पर्धेत बिगर व्यावसायिक गटातील 52 महाविद्यालयातून “संगम” नियतकालिकास तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. या नियतकालिकाचे कार्यकारी संपादक मराठी विभाग प्रमुख प्रा. एस. एस. बोंगाळे हे होते.

त्यांना सहसंपादक मंडळातील हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी. पी. जाधव, इंग्रजी विभागातील प्रा. डॉ. डी. के. नगरकर, संस्कृत विभाग प्रमुख प्रो. (डॉ.) श्रीमती एम. ए. शिंदे, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर. पी. पवार, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. एम. ए. कदमपाटील, श्रीमती एस. पी. पवार (कनिष्ठ विभाग) व श्री एल. ए. चव्हाण (कार्यालयीन विभाग) व प्र. प्राचार्य प्रा. डॉ. एस. आर. सरोदे यांचे सहकार्य लाभले. तसेच वैयक्तिक गटात कु. प्रतीक्षा लाटकर (बीए भाग 2) हिला इंग्रजी विषयातील ललित लेखन प्रकारात प्रथम क्रमांक, श्री अंकुश जाधव (बी ए भाग २) यास हिंदी विनोदी लेखन प्रकारात प्रथम क्रमांक व  कु. हर्षदा वाघ (बीए भाग ३) हिस संस्कृत विषयातील प्रोत्साहनपर लेखन प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

या  उत्तुंग यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराडचे जनरल सेक्रेटरी मा. श्री अल्ताफहुसेन नसिरुद्दीन मुल्ला, मा. श्री. अरुण पांडुरंग पाटील (काका), (विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड) व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) आर. आर. जाधव यांनी कार्यकारी संपादक व संपादक मंडळाचे आणि सर्व प्राध्यापक व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.