Home चंद्रपूर एसटी बस की कोळसा खाण? धुळीने मळलेली बस रस्त्यावर धावली 

एसटी बस की कोळसा खाण? धुळीने मळलेली बस रस्त्यावर धावली 

236

✒️रोशन मदनकर(उप संपादक )

ब्रम्हपुरी(दि.4एप्रिल):-नागपूर डेपोतून गडचिरोलीला जाणाऱ्या एसटी बसमध्ये धुळीचे साम्राज्य बघायला मिळाले. बसमध्ये बसल्यानंतर किंवा हातानी पुसल्या नंतर कोळसा खाणीत काम केल्या सारखे हात आणि कपडे मळले. बस कर्मचारी स्वच्छतेबाबत आंधळे होऊन धुळीने मळलेली बस प्रवासाकरिता रस्त्यावर काढली हे चित्र बघायला मिळाले.

दिनांक 3 एप्रिल 2026 ला नागपूर ते गडचिरोली जाणारी बस जवळपास 8 वाजून 20 मिनिटाला नागभीड येथे पोहचली. पुरोगामी संदेशचे प्रतिनिधी बस मध्ये बसले असता धुळीबद्दल विचारणा करण्यात आली. वॉशिंग करणे आमचा काम नाही आहे. तरी पण आम्ही काही सीट साफ केले असे उत्तर देत टाळाटाळ करण्यात आली.

परंतु काही वेळेतच नागभीड मधून प्रवास्यांना बस मधून उतरविण्यात आले आणि दुसऱ्या बसमध्ये पाठविण्यात आले. एसटी बस ब्रम्हपुरी डेपोमध्ये वॉशिंग करण्यात आली अशी माहिती सूत्रानुसार प्राप्त झाली. नागपूर डेपोतून बस काढतेवेळेस वाहक आणि चालक यांनी थोडी तत्परता बाळगली असती तर प्रवास्यांना नाहक त्रासाला समोर जावे लागले नसते. नागरिक या कृतीवर संताप व्यक्त करत आहेत. जागरूक नागरिकाने या कृत्याचा निषेध केला असून, बसमध्ये स्वच्छतेबाबत बस कर्मचारी जबाबदारी टाळत असल्याचे दिसून येत आहे.