

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.4एप्रिल):-तालुक्यातील वरूर रोड येथील सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय, वरूर रोड येथे नवनिर्मित आरओ वॉटर प्लांट भेट देण्यात आला. या प्लांटचे लोकार्पण आज शनिवार, ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून आरओ प्लांटचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोलार कंपनीचे व्यवस्थापक वसंत वरारकर, वरूरचे सरपंच गणपत पंधरे, उपसरपंच विजया करमणकर ग्रामपंचायत सदस्य विद्या टेकाम, रवी सोयाम, प्रतिष्ठित नागरिक मोरेश्वर धानोरकर, दिलीप मंगर यांचीही उपस्थिती होती.
वरूर गावातील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळावे, या उद्देशाने सोलार कंपनीने हा प्लांट कार्यान्वित केला आहे.
शुद्ध पाणी हा प्रत्येकाचा अधिकार असून, या सुविधेमुळे ग्रामस्थांचे आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.सोलार इंडस्ट्रीज (वरूर रोड) ही कंपनी सामाजिक बांधिलकी जोपासून नेहमीच वरूर गावाच्या विकासासाठी आणि गरजांसाठी मदतीचा हात पुढे करत असते. या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायत प्रशासन आणि समस्त गावकर्यांनी सोलार कंपनीचे आभार मानले आहेत. कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि सोलार कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.







