Home महाराष्ट्र राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार – ‘पिंजारलेल्या कल्लोळातून ‘, निळी सावळी नव्हाळी, नामानिराळां...

राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार – ‘पिंजारलेल्या कल्लोळातून ‘, निळी सावळी नव्हाळी, नामानिराळां चा समावेश

71

▪️जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार “दौलतनामा ” अर्शदनामा” ‘ अव्यक्ताचा चंद्र’ ला जाहीर

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहिल्यानगर(दि.8एप्रिल):-शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वाड्मय स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून ‘वाडा’, ‘पिंजारलेल्या कल्लोळातून’, ‘निळी सावळी नव्हाळी’, ‘नामानिराळा’ यांसह एकूण अकरा पुस्तकांना राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

या पुरस्कारांचे वितरण २३ व २४ मे रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनात करण्यात येणार असल्याची माहिती शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.

शब्दगंध साहित्यिक परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रा. डॉ. अनिल गर्जे, प्रा. डॉ. किशोर धनवटे, प्रा. डॉ. आशा पालवे, बाळासाहेब शेंदुरकर, स्वाती ठुबे व शर्मिला गोसावी यांनी परीक्षण करून निकाल जाहीर केला.

राज्यस्तरीय पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे :

कादंबरी : वाडा – संदीप वाकडे

कथासंग्रह : पिंजारलेल्या कल्लोळातून – डॉ. संदीप तपासे (नाशिक)

काव्यसंग्रह : निळी सावळी नव्हाळी – डॉ. स्वाती पाटील (सांगली)

काव्य : ऊसवलेलं शिवता येईल का? – वर्षा चौबे (चंद्रपूर)

आत्मकथन : मायंबा ते मुंबई – डॉ. शिवाजी घुंगरड (पनवेल)

व्यक्तीचित्रण : आदर्श छत्रपती शिवाजी महाराज – डॉ. मधुकर जाधव (चंदगड)

संशोधन ग्रंथ : सृजनकडून सर्जनशीलतेचा प्रवास – डॉ. स्नेहा महांबर (गोवा)

बालवाङ्ममय : ढ.. ढ.. – डॉ. विशाल तायडे (संभाजीनगर)

गझलसंग्रह : नामानिराळा – बाळ पाटील (धाराशिव)

लेखसंग्रह : रे मना – वैशाली जाहागीरदार (छत्रपती संभाजीनगर)

प्रवासवर्णन : सावळ्या विठ्ठलाच्या देशात – वर्षा कुवळेकर (अलिबाग)

जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार २०२५ :

काव्यसंग्रह : अव्यक्ताचा चंद्र – शारदा घोडके (देऊळगाव)

आत्मचरित्र : दौलतनामा – दौलत जाधव (कोपरगाव)

कथासंग्रह : चरेविती – सयाजी शिंदे (राहुरी)

लेखसंग्रह : अर्षदनामा – अर्शद शेख (नगर)

या पुरस्कारांचे स्वरूप शाल, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे असून संमेलनात सर्व साहित्यिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या सर्व विजेत्यांचे सुनील गोसावी, राजेंद्र उदागे, भगवान राऊत, ज्ञानदेव पांडुळे, प्रा. डॉ. अशोक कानडे, जयश्री झरेकर, भारत गाडेकर, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, राजेंद्र फंड, बबनराव गिरी, सुभाष सोनवणे, राजेंद्र पवार, रविंद्र दानापुरे, प्रशांत सूर्यवंशी, मकरंद घोडके तसेच संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी अभिनंदन केले आहे.