Home चंद्रपूर शासकीय कामानिमित्त आता जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची गरज नाही

शासकीय कामानिमित्त आता जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची गरज नाही

15

▪️जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरिकांसाठी चॅटबोट व अभ्यागत सेवा फॉर्म उपलब्ध

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.15मे):-पश्चिमी आखाती देशात युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी नागरिकांनी काटकसरीचे धोरण अवलंबविण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये, नागरिकांचा त्रास वाचावा तसेच येण्याजाण्याकरीता लागणा-या पेट्रोल – डिझेलची बचत व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून चॅटबोट क्रमांक व ऑनलाईन अभ्यागत सेवा फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे.

त्यामुळे आता नागरिकांना शासकीय कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची गरज पडणार नाही. या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

‘चांदा महसूल मित्र’ या नावाचे हे चॅटबोट असून 9284061588 या क्रमांकावर आता महसूल विभागाशी संबंधित सेवा, नागरिकांच्या अडीअडचणी, तक्रारींचे निराकरण नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे नागरिकांनी या क्रमांकाचा वापर करावा. तसेच जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांना कामानिमित्त भेटण्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात न येता अभ्यागत सेवा फॉर्मच्या माध्यमातून आपली समस्या / तक्रार निदर्शनास आणून देता येईल. या अभ्यागत सेवा फॉर्म मध्ये 1) अभ्यागताचे पूर्ण नाव 2) मोबाईल क्रमांक 3) ई-मेल आयडी (असल्यास) 4) पत्ता / गाव / तालुका 5) कामाचे स्वरुप 6) संबंधित कार्यालय / शाखा / अधिकारी / कर्मचारी नाव (असल्यास) 7) कागदपत्रे अपलोड करून सदर फॉर्म सबमीट करावयाचा आहे. या लिंकद्वारे संबंधित

https://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSfwVvlCvdfLZVZ४NEW५_a-FedlRxve४Alrmmd५०९२OlkeL-gA/viewform?usp=publish-editor

नागरिक आपले म्हणने मांडू शकतात, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.