चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमुर(दि:-24जून)नवोदय परीक्षेत तालुक्यातील सहा विध्यार्थी मेरिट आले असून न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूर येथील विद्यार्थिनी कु.आकांक्षा नरेन्द्र दडमल हिची नवोदय विद्यालय तळोधी(बा.) येथे ईयत्ता सहावी करीता निवड झाली आहे,तिने नवोदय परीक्षेत मेरीट येण्याचा मान पटकाविला आहे,त्यामुळे या यशस्वी विद्यार्थिनीचे संस्था व तिचे मार्गदर्शक शिक्षक यांच्यासह शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
तिने आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे उपाध्यक्ष सचिव व ईतर पदाधिकारी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मार्गदर्शक शिक्षक, आई-वडील यांना दिले आहे.



