?चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमुर(26जून):-लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य नागरीक ,मजुर ,किरकोड व्यापारी यांचे आर्थिक बिघडले आहे .त्यामूळे विज वितरण विभागाने पाठविलेले अवाजवी वीज बिल भरणे अनेकांच्या आवाक्या बाहेर आहे .करीता सरसकट विज बिल माफ करण्याची मागणी कनिष्ठ अभियंता अधिकाऱ्यास दिलेल्या निवेदनातुन चिमूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली .
कोविड -१९ कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता देशभर लागु केलेल्या लॉकडाऊन मुळे सामान्य नागरीक ,मजुर व गरीबांचे कंबरडे मोडले आहे . ज्यामुळे कुटूंबाच्या भरण पोषणाचा प्रश्न उभा ठाकल आहे .विजबिल कसे भरावे व विजबिल भरले नाही तर आपली विज जोडणी खंडित होईल अशी भीती नागरीकांना वाटत अहे . त्यामूळे सामान्य नागरिकांच्या परीस्थितीचा गंभीर विचार करून चार महिन्याचे आलेले अवाजवी विज बिल सरसकट माफ करण्याची मागणी चिमूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानी निवेदनातून केली आहे .
निवेदन कनिष्ठ अभियंता शाखा चिमूर यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उर्जा मंत्री, राज्याचे गृहमंत्री यांना दिले आहे निवेदन देताना चिमूर राका अधक्ष योगेश ठूने शहर अधक्ष मंगेश बारापात्रे, रमेश खेरे, अनिल रामटेके अजय चौधरी, रामदास ठुसे,जावेद पठाण, जयंता कामडी, पदाधिकारी उपस्थित होते .



